महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अंतिम क्षणी सेन्सेक्स-निफ्टी प्रभावित

06:15 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक घडामोडींच्या परिणामुळे भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील  शेवटच्या दिवशी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक हे घसरणीसह बंद झाले आहेत.

बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 453.85 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 72,643.43 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 123.30 अंकांनी प्रभावित होत निर्देशांक 22,023.35 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांमधील 24 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले तर 6 कंपन्यांचे समभाग हे वधारले. सेन्सेक्समधील कंपन्यांची स्थिती पाहिल्यास महिंद्रा अॅण्ड महिंद्राचा समभाग 5.01 टक्क्यांनी नुकसानीत राहिला असून यासोबतच टाटा मोर्ट्स, एनटीपीसी, एचसीएल टेक, लार्सन अॅण्ड टुब्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि स्टेट बँक यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले. तर अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस आणि इंडसइंड बँक यांचे समभाग हे वधारुन बंद झाले आहेत.

या कारणांमुळे घसरण

सध्या जागतिक व स्थानिक पातळीवरील होत असणाऱ्या मुख्य घडामोडींचा परिणाम हा जगासह देशातील शेअर बाजारात प्रभाव निर्माण करत आहे. यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील पैसा काढून घेतला आहे. यासोबतच जागतिक बाजारातील नरमाईचा फटका व अमेरिकन फेडरल रिझर्व्ह यांच्याकडून व्याजदरात करण्यात येणाऱ्या कपातीबाबतच्या चिंतेमुळेही भारतीय बाजाराचा प्रवास नुकसानीत राहिला होता.

दक्षिण कोरियाचा सियोल, जपानचा टोकीओ आणि हाँगकाँगचा शेअर बाजार नीचांकी पातळीवर बंद झाला. तर शांघाय हा बाजार तेजीसह बंद झाला. यासह युरोपीय बाजारात काहीशी तेजी राहिली होती. यासह गुरुवारी अमेरिकेच्या बाजारात नकारात्मक वातावरण राहिले होते.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article