सेन्सेक्स-निफ्टीची पुन्हा विक्रमी झेप
सेन्सेक्स 141.34 तर निफ्टी 51 अंकांनी तेजीत : रिलायन्स, आयसीआयसीआय वधारले
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक पुन्हा नव्या विक्रमावर पोहोचले आहेत. यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक व एचडीएफसी बँक यांच्या समभागांमध्ये लिलाव झाला. याचा फायदा भारतीय बाजाराला झाला आहे. मुख्य कंपन्यांच्या मदतीने गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 141.34 अंकांनी वधारुन निर्देशांक 77,478.93 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 51.00 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 23,567.00 वर बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये जेएसडब्लू स्टीलचे समभाग हे 1.67 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, अॅक्सिस बँक, एशियन पेन्ट्स, एचडीएफसी बँक यांचे समभाग हे वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये गुरुवारी सनफार्माचे समभाग हे 2.24 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. तसेच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, स्टेट बँक, विप्रो, पॉवरग्रिड कॉर्प, भारती एअरटेल, टायटन, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस यांचे समभाग हे प्रभावीत होत बंद झाले.
या कारणांमुळे बाजारात चमक
गुरुवारच्या सत्रात भारतीय बाजारात खासगी बँक आणि धातू या क्षेत्रांमधील चमकने बाजाराला मजबूत बनवले आहे. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक यांच्या कामगिरीचा लाभही बाजारात झाला आहे. निफ्टीमधील सकारात्मक कल राहिल्याचा फायदा हा बँकिंग क्षेत्राला झाला असून आगामी काळातही यामधून आशादायी चित्र राहणार असल्याचा अंदाज शेअर बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सलग दुसऱ्या दिवशीच्या सत्रात खत क्षेत्रातील समभाग हे 20 टक्क्यांनी मजबूत राहिले.
जागतिक स्थिती
आशियातील बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा सियोल आणि जपानचा टोकीओ हे वधारले आहेत. तर शांघाय व हाँगकाँगचा बाजार घसरणीत राहिला. युरोपीयन बाजारात सकारात्मक स्थिती राहिली होती.
समभाग वधारलेल्या कंपन्या
? जेएसडब्लू स्टील 930
? टाटा स्टील 182
? आयसीआयसीआय 1156
? रिलायन्स इंडस्ट्रीज 2946
? कोटक महिंद्रा 1765
? अॅक्सिस बँक 1237
? एशियन पेन्ट्स 2918
? हिंदुस्थान युनि 2478
? टेक महिंद्रा 1392
? एचडीएफसी बँक 1669
? नेस्ले 2538
? इन्फोसिस 1515
? लार्सन अॅण्ड टुब्रो 3597
? टाटा मोर्ट्स 978
? एचसीएल टेक 1446
? वेदान्ता 470
? मॅक्स हेल्थकेअर 935
? हिंडाल्को 676
? युपीएल 568
? बीपीसीएल 626
? अशोक लेलँड 236
? मॅरिको 628
? कोल इंडिया 483
? बँक ऑफ बडोदा 285
? आयशर मोर्ट्स 4898
? ब्रिटानिया 5384
? एसबीआय लाईफ 1454
समभाग घसरलेल्या कंपन्या
? सनफार्मा 1470
? महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2870
? एनटीपीसी 357
? स्टेट बँक 843
? विप्रो 490
? पॉवरग्रिड कॉर्प 324
? भारती एअरटेल 1381
? टायटन 3433
? मारुती सुझुकी 12143
? बजाज फिनसर्व्ह 1586
? टीसीएस 3786
? अल्ट्राटेक सिमेंट 10951
? बजाज फायनान्स 7207
? आयटीसी 423