सेन्सेक्स-निफ्टीची नव्या विक्रमाची नोंद
अंतिम सत्रात सेन्सेक्स 970 अंकांनी तेजीत तर निफ्टीही तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक नव्या विक्रमांची नोंद करत बंद झाल्याचे दिसून आले. बाजारात चौफेर अशा विक्रीच्या कामगिरीने सप्ताहाचा समारोप झाला आहे. या अगोदरच्या दिवशी फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाने सलग दुसऱ्या सत्रात शेअरबाजार चमकला होता. याचा सकारात्मक परिणाम हा एकूण भारतीय बाजारात दिवसभर झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 970 अंकांनी मजबूत होत बंद झाला. तर निफ्टी 274 अंकांनी वधारुन नवी उंची प्राप्त करत बंद झाला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपचा निर्देशांक सर्वोच्च उच्चांकावर राहिला आहे. प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 969.55 अंकांसोबत निर्देशांक 1.37 टक्क्यांनी वधारुन 71,483.75 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 273.95 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 21,456.70 वर स्थिरावला आहे.
निफ्टी बँक निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत राहिला असून बीएसई स्मॉलकॅप आणि निफ्टी मिडकॅप वधारले आहेत. मुख्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आणि स्टेट बँक यांचे समभाग हे मजबूत राहिले आहेत. तसेच अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ आणि भारती एअरटेल यांचे समभाग प्रभावीत झाले.
आठवड्यातील अंतिम दिवशी आणि गुरुवारी मल्टीबॅगरचे समभाग पाहिल्यास यात सेरेमिक्स, कॅमबाउंड केमिकल्स, पीएनबी, वॉकहार्ट लिमिटेड, इंडियन ऑईल, डीपी वायर्स आणि बंधन बँक यांचे समभाग तेजीत होते.
तेजी आगामी काळातही राहणार
भारतीय भांडवली बाजारात गुरुवारी व शुक्रवारी प्राप्त केलेली नवी उंची ही कामगिरी आगामी काळात म्हणजे नवीन आठवड्यात कायम राहणार असल्याचे संकेत अधिक आहेत.