चौथ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी तेजीत
चढउतारांच्या प्रवासासोबत बाजार बंद : जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाचा परिणाम
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्याच्या चौथ्या सत्रात गुरुवारी बीएएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारले आहेत. यामध्ये दिवसभरातील कामगिरीत बाजारात चढउताराची स्थिती राहिली होती. दरम्यान जागतिक बाजारांमधील मजबूत स्थितीचा फायदा हा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले. प्रमुख कंपन्यांमध्ये ऊर्जा आणि तेल व गॅस या क्षेत्रातील लॉजर्कप यासोबतच एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, बीपीसीएल आणि ओएनजीसी तसेच स्टेट बँक व एचडीएफसी बँक यांचे समभाग वधारल्याचा फायदा हा गुरुवारी भारतीय बाजाराला झाला. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 227.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 72,050.38 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 70.70 अंकांनी तेजी प्राप्त करत निर्देशांक 21,910.75 वर बंद झाला आहे. बाजारातील व्यापक स्थितीमध्ये बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप याचा निर्देशांक हा जवळपास 1 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारला आहे. यावेळी ऊर्जा आणि तेल व गॅस या क्षेत्रातील लॉर्जकॅपमध्ये सकारात्मक स्थिती राहिली होती. यावेळी एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, बीपीसीएल आणि ओएनजीसी यांचे समभाग हे 3 ते 5 टक्क्यांपर्यंत वधारुन बंद झाले. तसेच स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग मात्र 2 टक्क्यांनी अधिक राहिले आहे. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अपोलो हॉस्पिटल्स आणि सनफार्मा यासोबतच आयटीसी, नेस्ले, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि ब्रिटानिया यांचे समभाग हे 0.7 ते 2 टक्क्यांनी घसरणीत राहिले आहेत.
आजच्या बाजाराकडे गुंतवणूकदारांच्या नजरा
आठवड्यातील आज शेवटचे सत्र आहे. यामुळे भारतीय बाजारातील तेजीचा कल कायम राहणार का? तो प्रभावीत होणार हे मात्र पहावे लागणार असल्याचे काही शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे. दरम्यान जागतिक आर्थिक स्थिती व अन्य घडामोडींचाही यावर प्रभाव राहणार आहे का? याचा मागोवा घेत गुंतवणूकदारांनी आजची आपली रणनीती तयार करणे आवश्यक आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- महिंद्रा आणि महिंद्रा 1765
- बीपीसीएल 652
- एनटीपीसी 339
- ओएनजीसी 277
- पॉवरग्रिड कॉर्प 281
- एसबीआय 761
- कोल इंडिय 476
- एचडीएफसी बँक 1414
- एशियन पेंट्स 3016
- युपीएल 487
- हिंडाल्को 513
- टायटन 3622
- विप्रो 518
- इन्फोसिस 1676
- टेक महिंद्रा 1300
- मारुती सुझुकी 11,090
- बजाज ऑटो 8123
- भारती एअरटेल 1120
- आयशर मोटर्स 3916
- एलटीआय माइंट्री 5522
- अल्ट्राटेक सिमेंट 9814
- टाटा मोटर्स 920
- ग्रासिम 2084
- टीसीएस 4103
- हिरोमोटो कॉर्प 4816
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अॅक्सिस बँक 1072
- अपोलो हॉस्पिटल 6627
- आयटीसी 403
- एचयुएल 2350
- नेस्ले 2453
- ब्रिटानिया 4950
- रिलायन्स 2941
- सनफार्मा 1509
- बजाज फिनसर्व्ह 1569
- आयसीआयसीआय 1016
- कोटक महिंद्रा 1739
- एचसीएल टेक 1662
- अदानी एंटरप्रायजेस 3193
- बजाज फायनान्स 6619
- इंडसइंड बँक 1476
- डिव्हिज लॅब्स 3708