कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अस्थिरतेमध्ये सेन्सेक्स-निफ्टीची पडझड

07:00 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मीडिया, धातूसह ग्राहकोपयोगी वस्तू समभागांमध्ये विक्री

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील बुधवारच्या सुट्टीनंतर पुन्हा भारतीय शेअर बाजार गुरुवारी सुरु झाला. यावेळी सलग दुसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाला. दरम्यान मीडिया, धातू आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागांच्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स 57 अंकांच्या वाढीसह उघडला. व्यापारादरम्यान 148.14 अंकांनी किंवा 0.18 टक्क्यांसह निर्देशांक 83,311.01 वर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 87.95 अंकांच्या घसरणीसोबत  निर्देशांक 25,509.70 वर बंद झाला.

मुख्य कंपन्यांमध्ये पॉवर ग्रिड, इटर्नल, बीईएल, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँक हे सर्वाधिक तोट्यात होते, तर एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि टीसीएस या सर्वाधिक तेजीमधील कंपन्या राहिल्या आहेत. प्रमुख समभागांसह व्यापारी बाजारातही मंदीचा कल दिसून आला. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.95 टक्क्यांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 1.4 टक्क्यांनी घसरला.

क्षेत्रनिहाय कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, निफ्टी मीडिया निर्देशांक 2.54 टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्यानंतर धातू क्षेत्रात 2.07 टक्के आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये 1.98 टक्क्यांनी घसरण झाली. निफ्टी आयटी आणि ऑटो हे दोन निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. अनुक्रमे 0.18 टक्के आणि 0.06 टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली.

बाजार का घसरत आहे?

आशियाई बाजारपेठेतील सकारात्मक संकेत असूनही एफपीआय विक्री सुरू असल्याने देशांतर्गत बाजारपेठांमध्ये अस्थिरता आहे, मोठ्या प्रमाणात नफा होत आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. एशिया-पॅसिफिक बाजारांमध्ये गुरुवारी जबरदस्त तेजी दिसून आली. बुधवारी अमेरिकन बाजारांमध्ये झालेल्या मजबूतीचा परिणाम आशियाई व्यापार सत्रात दिसून आला.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article