सेन्सेक्स-निफ्टी नव्या विक्रमासोबत बंद
सेन्सेक्स 384 अंकांनी वधारला : महिंद्राचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार नव्या विक्रमी स्तरावर बंद होण्यात यशस्वी झाला आहे. सेन्सेक्स 384 अंकांनी तर निफ्टी 138 अंकांनी वाढत बंद झाला. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग सर्वाधिक तेजीत होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 384 अंकांनी वाढत 84,928 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 148 अंकांनी वाढत 25,939 अंकांवर बंद झाला. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांनी सर्वकालीक उच्चांकी स्तर सोमवारी गाठला. निफ्टीने सकाळी 25,873 अंकांवर तर सेन्सेक्स 84,651 अंकांवर खुला झाला होता.
हे समभाग तेजीत
सोमवारी महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग सर्वाधिक 3 टक्के वाढत 3050 रुपयांवर बंद झाले होते. यानंतर पाहता भारतीय स्टेट बँकेचे समभाग 2.58 टक्के वाढत 801 रुपयांवर बंद झाले. भारती एअरटेलचे समभाग 2.27 टक्के वाढत 1750 रुपयांवर बंद झाले तर एचयुएलचे समभाग 1.72 टक्के आणि कोटक बँकेचे समभाग 1.59 टक्के वाढत बंद झाले.
हे समभाग घसरले
आयसीआयसीआय बँकेचे समभाग सोमवारी सर्वाधिक घसरणीत होते. समभाग 1.24 टक्के इतके घसरत 1322 रुपयांवर बंद झाले होते. इंडसइंड बँकेचे समभाग 1.03 टक्के घसरत 1465 रुपयांवर, टेक महिंद्राचे 0.92 टक्के घसरत 1607 रुपयांवर बंद झाले होते. एशियन पेंटस्चे समभाग 0.90 टक्के घसरत 3277 रुपयांवर बंद झाले.
आयटी निर्देशांक मात्र घसरणीत..
विविध निर्देशांकाच्या सोमवारच्या कामगिरीवर नजर फिरवल्यास फक्त आयटी निर्देशांक मात्र घसरणीत दिसून आला. आयटी निर्देशांक 0.51 टक्के इतका घसरत 41,987 स्तरावर बंद झाला. निफ्टी पीएसयु बँक निर्देशांक 3.41 टक्के इतका सर्वाधिक वाढलेला दिसला. निफ्टी ऑटो 1.56 टक्के, एनर्जी 1.21 टक्के आणि बँक निफ्टी निर्देशांक 0.58 टक्के इतक्या तेजीसह 54,106 स्तरावर बंद झाला होता.
जागतिक बाजारात अमेरिकेतील बाजारात घसरण काहीशी दिसून आली. नॅसडॅक 65 अंक व डोव्ह जोन्स 27 अंकांनी घसरणीत होता. युरोपात मिश्र कल पाहायला मिळाला. गिफ्ट निफ्टी 125 अंकांनी तेजीत होता. तर निक्केई 568 अंकांनी वधारत व्यवहार करत होता. कोस्पी 8 व शांघाय कंपोझीट 12 अंकांनी तेजीत होते. तर हँगसेंग मात्र 11 अंकांनी घसरणीत होता.