सेन्सेक्स-निफ्टी दुसऱ्या सत्रातही मजबूत
तीन राज्यातील निकालाचा प्रभाव कायम : निफ्टीही नव्या उच्चांकावर
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत स्थितीत राहिल्याचे दिसून आले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाच्या मजबूत विजयाचे पडसाद सोमवारी व मंगळवारी या दोन्ही दिवसांच्या बाजारातील व्यवहारांमध्ये दिसून आले. ही निकालाची जादू आणखी किती दिवस बाजाराला ऊर्जा देणार हे पहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
मंगळवारच्या सत्रात अमेरिकेतील मुख्य आर्थिक आकडे सादर होण्याच्या अगोदरच जागतिक बाजारांमध्ये नरमाईचा कल राहिला होता. याचा लाभ भारतीय शेअर बाजाराला झाला असून यामध्ये सेन्सेक्स दिवसअखेर 431.02 अंकांच्या मजबूत स्थितीसोबत निर्देशांक 69,296.14 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 168.30 अंकांनी वधारुन निर्देशांक 20,855.10 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग हे सर्वाधिक 4.46 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच एनटीपीसी 3.89 टक्के, स्टेट बँक 2.31 आणि आयसीआयसीआय बँक 2.28 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासोबतच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टायटन आणि मारुती सुझुकी यांचे समभाग तेजीसह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, एचसीएल टेक, इन्फोसिस, आयटीसी, विप्रो आणि बजाज फायनान्स यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले.
बाजारमूल्यात वाढ
बीएसईमधील लिस्टेट कंपन्यांचे बाजारमूल्य मंगळवारच्या सत्रात 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकने वधारुन 350 लाख कोटी रुपयाचा टप्पा पार केला आहे.
बाजारातील तेजीचे कारणे
? भाजपाने तीन राज्यातील मोठ्या विजयानंतर पॉवर आणि युटिलिटी क्षेत्रातील समभागांमध्ये मजबूत खरेदी
? मागील सप्ताहातील सकारात्मक मॅक्रो इकोनॉमिक डाटानंतर विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारात गुंतवणूक मिळाली.