For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेन्सेक्सची विक्रमी 84,000 अंकांवर झेप

06:22 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सेन्सेक्सची विक्रमी 84 000 अंकांवर झेप
Advertisement

सेन्सेक्स 1360 अंकांवर मजबूत  : निफ्टीही तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बँकांच्या समभागांमधील तेजी आणि जागतिक बाजारांमधील मिळताजुळता कल यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजीची त्सुनामी आल्याचे दिसून आले. बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांमध्ये बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांच्यात शुक्रवारी 1 टक्क्यांची सर्वाधिक तेजी राहिली.

Advertisement

ऐतिहासिक तेजी प्राप्त करत बाजाराने शुक्रवारी मोठा उत्साह प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले. यामुळे सेन्सेक्स प्रथमच 84,000 च्या उंचीवर पोहोचला. तर निफ्टीही 25,800 च्या जवळपास जात बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1359.51 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 1.63 अंकांची भक्कम वाढ नोंदवत 84,544.31 वर ऐतिहासिक विक्रम नोंदवत बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 375.15 अंकांनी वधारुन 1.48 टक्क्यांच्या तेजीसह निर्देशांक 25,790.95 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 26 समभाग वधारले आहेत. यामध्ये पहिल्या पाच कंपन्यांमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्लू स्टील, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि भारती एअरटेल यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. यासोबतच नेस्ले इंडिया, अदानी पोर्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, पॉवरग्रिड कॉर्प, कोटक बँक, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, एचसीएल टेक, रिलायन्स इंडस्ट्रीज, सनफार्मा, इन्फोसिस, टायटन, एशियन पेन्ट्स, टाटा मोर्ट्स, अॅक्सिस बँक आणि एनटीपीसी यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समध्ये घसरणीत फक्त चार समभाग राहिले आहेत. यामध्ये स्टेट बँक, इंडसइंड बँक, टीसीएस आणि बजाज फायनान्स यांच्या समभागांचा यामध्ये समावेश राहिला आहे. अमेरिकन फेडकडून व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.