बाजारात सेन्सेक्सची 1,000 अंकांवर झेप
जागतिक संकेतामुळे बाजाराला बळ : गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवड्यातील चौथ्या दिवशीच्या सत्रात गुरुवारी जागतिक बाजारातील सकारात्मक कल राहिल्याच्या कारणास्तव भारतीय शेअर बाजार मजबूत कामगिरी करत बंद झाला आहे. गुंतवणूकदारांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात राहिला होता. दरम्यान मुख्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल सारख्या दिग्गज कंपन्यांच्या जोरदार कामगिरीमुळे सलग तिसऱ्या सत्रात बाजार उंचावला.
बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1000.36 अंकांनी वधारुन निर्देशांक 1.21 टक्क्यांच्या वाढीसह 83,755.87 वर बंद झाला. याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अखेरच्या क्षणी 304.25 अंकांनी वधारुन तो 25,549.00 वर बंद झाला. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या समभागांमध्ये श्रीराम फायनान्स, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, टाटा स्टील, भारती एअरटेल आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज हे सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे, डॉ. रे•ाrज लॅबोरेटरीज, टेक महिंद्रा, विप्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि हिरो मोटोकॉर्प या समभागांध्ये घसरण राहिली आहे.
बँक निफ्टीमध्ये जोरदार तेजी
व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक अनुक्रमे 0.59 टक्के आणि 0.42 टक्क्यांनी घसरून बंद झाले. तर बँक निफ्टीने 585 अंकांच्या दमदार तेजीसोबत 57206 अंकांवर म्हणजेच नव्या उच्चांकावर बंद होण्यात यश मिळवलं होतं.
जागतिक बाजारात तेजी
जागतिक आघाडीवर, गुरुवारी आशिया-पॅसिफिक बाजारांमध्ये संमिश्र सुरुवात झाली. गुंतवणूकदार इराण-इस्रायल युद्धबंदीच्या स्थितीकडे पाहत आहेत. जपानचा निक्केई निर्देशांक 0.98 टक्क्यांनी वाढला, तर टॉपिक्स निर्देशांक 0.48 टक्क्यांनी वधारला आहे. दरम्यान, सर्व बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 3.33 लाख कोटी रुपयांनी वाढून 457.33 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असल्याचे दिसून आले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- श्रीराम फायनान्स 703
- जियो फायनॅन्शीयल 312
- हिंडाल्को 690
- टाटा स्टील 160
- अदानी पोर्टस् 1429
- बजाज फायनान्स 951
- भारती एअरटेल 2014
- इटर्नल 265
- अदानी एंटरप्रायझेस 2586
- एचडीएफसी बँक 2021
- बजाज फिनसर्व्ह 2053
- रिलायन्स 1495
- एनटीपीसी 337
- अल्ट्राटेक सिमेंट 11951
- एचडीएफसी लाइफ 799
- ग्रासिम 2883
- टाटा कंझ्यु. 1145
- अॅक्सिस बँक 1233
- टाटा मोटर्स 682
- ओएनजीसी 244
- टायटन 3694
- नेस्ले 2431
- लार्सन टुब्रो 3659
- एसबीआय लाइफ 1860
- आयटीसी 420
- आयसीआयसीआय 1439
- अपोलो हॉस्पिटल 7101
- जेएसडब्ल्यू स्टील 1032
- बजाज ऑटो 8433
- एचसीएल टेक 1724
- सिप्ला 1513
- कोटक महिंद्रा 2203
- एचयुएल 2280
- इन्फोसिस 1616
- सनफार्मा 1669
समभाग घसरलेल्या कंपन्या
- डॉ. रे•िज लॅब्ज 1321
- टेक महिंद्रा 1690
- हिरो मोटोकॉर्प 4278
- मारुती सुझुकी 12715
- एसबीआय 797
- विप्रो 268