For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेन्सेक्स प्रभावीत; निफ्टीत तेजीची झुळूक

06:24 AM Feb 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
सेन्सेक्स प्रभावीत  निफ्टीत तेजीची झुळूक
Advertisement

जागतिक पातळीवरील संमिश्र स्थितीचा परिणाम

Advertisement

मुंबई :

जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजार स्थिर स्थितीत बंद झाला. बाजाराची सुरुवातही काहीशी संथपणे सुरु झाली. दरम्यान  ऑटो, फार्मा आणि पीएसयू बँकिंग समभागांमध्ये खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला परंतु आयटी समभागांमध्ये सततच्या दबावामुळे बाजार स्थिर राहिल्याचे दिसून आले आहे.  बीएसई सेन्सेक्स 84,339 अंकांवर किंचित वाढून उघडला. परंतु अखेरच्या क्षणी सेन्सेक्स 40.28 अंकांनी घसरून 84,233.64 वर बंद झाला. याप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजारात चढ-उतारांसह निफ्टी दिवसअखेर 18.70 अंकांनी किरकोळ वाढीसह 25,953.85 वर बंद झाला.

Advertisement

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टीसीएसचे शेअर्स सर्वात जास्त घसरले. ते 2.46टक्क्यांनी घसरले. इन्फोसिस, एचसीएल टेक, इटरनल, आयटीसी, टेक महिंद्रा, टायटन आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.  दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले आणि मार्केट कॅपनुसार टीसीएसला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची कंपनी ठरली.

निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.03 टक्के आणि 0.02 टक्के वाढले. क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी हेल्थकेअर सेक्टरने सर्वाधिक 1.62 टक्के वाढ नोंदवली. त्यानंतर निफ्टी ऑटो 1.3 टक्क्यांनी वाढला. तर निफ्टी आयटी सर्वात कमकुवत कामगिरी करणारा क्षेत्र राहिला. त्यात 1.76 टक्क्यांनी घट झाली.

जागतिक संकेत

बुधवारी आशियाई बाजार तेजीत राहिले. जपानचा निक्केई निर्देशांक मजबूत वाढीसह वर व्यवहार करत होता, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियामधील बाजारांमध्येही किंचित ते मध्यम वाढ नोंदवली गेली. आशियाई बाजारातील ही मजबूती अशा वेळी आली आहे जेव्हा अलिकडच्या व्यापार सत्रात अमेरिकन बाजार मिश्रित राहिले आहेत.

Advertisement
Tags :

.