अंतिम सत्रात सेन्सेक्स 622 अंकांनी मजबूत
टीसीएस समभागांमध्ये तेजी : दोन्ही निर्देशांक नव्या विक्रमी उंचीवर झेपावले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी सलगच्या दोन दिवसांच्या घसरणीला विराम मिळाला आहे. यात टीसीएस या टेक कंपनीच्या तिमाही अहवालामुळे बाजारात सकारात्मक स्थिती राहिली. बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक नव्या विक्रमांवर पोहोचले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 622.00 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 80,519.34 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 186.20 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 0.77 टक्क्यांसोबत 24,502.15 वर बंद झाला आहे.
शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्समधील 20 समभाग हे वधारले आहेत. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीमधील अनेक कंपन्यांचे नफा कमाईचे अहवाल सादर करण्यात येत आहेत. यामध्ये टीसीएस या टेक कंपनीचे समभाग हे जवळपास 7 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. तसेच संभाव्य मागणीमधील सुधारणात्मक स्थितीसह अन्य संकेताचा फायदा हा बाजाराला झाला आहे.
अन्य मुख्य आयटी कंपन्यांमध्ये इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, यांचेही समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँक, जेएसडब्लू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अॅण्ड टुब्रो, स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट, पॉवरग्रिड कॉर्प, आयटीसी आणि एनटीपीसी यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.
दुसऱ्या बाजूला सेन्सक्समधील 10 समभाग हे घसरणीत राहले आहेत. मारुती सुझुकी, एशियन पेन्ट्स, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक आणि टायटन यांचे समभाग हे घसरणीत पहिल्या यादीत राहिले आहेत. यासह भारती एअरटेल, टाटा मोर्ट्स, सनफार्मा, टाटा स्टील आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग हे नुकसानीत राहिले होते.
शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थाच्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी निव्वळ 1,137.01 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे.