कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अंतिम सत्रात सेन्सेक्स 345 अंकांनी प्रभावीत

05:37 AM Oct 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुंतवणूकदारांचा सावध पावित्रा : निफ्टीही 96 अंकांनी नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद झाला. या अगोदरच्या दिवशी गुरुवारी बाजारात नफाकमाईमुळे  काहीशी तेजी राहिली होती. परंतु आगामी दिवसांमध्ये येणारे जागतिक पातळीवरील संकेत व अन्य गोष्टीमुळे बाजारात गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याचे दिसून आले आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी दिवसअखेर 344.52 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.41 टक्क्यांसोबत 84,211.88 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी  96.25 अंकांनी घसरून निर्देशांक 25,795.15 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी नफा मिळवला आणि भारत-अमेरिका व्यापाराबद्दल सावधगिरी बाळगली. दरम्यान, भारतीय शेअर बाजाराने अलीकडेच वर्षातील सर्वात मोठ्या तेजीचा विक्रम प्रस्थापित केला. सलग चार आठवड्यांपासून बाजारात वाढ दिसून आली आहे. मजबूत तिमाही निकाल, सणासुदीच्या हंगामातील मजबूत विक्री आणि जागतिक व्यापारातील तणाव कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.

आयटी क्षेत्र चमकले

गेल्या सहा सत्रांमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स 3 टक्क्यांनी वाढले आहेत. दोन्ही निर्देशांक संपूर्ण आठवड्यात 0.3 टक्क्यांनी वाढले होते. 16 पैकी 9 प्रमुख क्षेत्रांमध्ये वाढ दिसून आली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांमध्येही अनुक्रमे 0.7 टक्के आणि 0.6 टक्के वाढ झाली. या आठवड्यात आयटी क्षेत्राने सर्वाधिक वाढ नोंदवली, जी 3 टक्के वाढ होती. कंपनीच्या प्रवर्तकांनी शेअर बायबॅकमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतल्याने इन्फोसिसचे शेअर्स 5.9 टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे, पीएसयू बँक 2.3 टक्क्यांनी वाढली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बँकांच्या ठोस तिमाही निकालांनीही बाजाराला पाठिंबा दिला. भारत-अमेरिका व्यापारावरील चर्चा चांगलीच तापली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article