महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स 128 अंकांनी मजबूत

07:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या स्थिर व्याजदर, जीएसटीसह अन्य आकडेवारीचाही प्रभाव

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात बुधवारी महाराष्ट्र दिनानिमित्ताने एक दिवसाच्या सुट्टीनंतर बाजार पुन्हा गुरुवारच्या सत्रात नेहमीप्रमाणे सुरु राहिल्याचे दिसून आले. यामध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह या केंद्रीय बँकेने 5.5 टक्के इतके स्थिर व्याजदर कायम ठेवले आहे. या निणर्यानंतर गुरुवारी भारतीय बाजारात तेजीचा कल दिसला आहे. दरम्यान एप्रिलमधील जीएसटी संकलनाने विक्रमी टप्पा प्राप्त केला असून विदेशी संस्थांकडून गुंतवणुकीमधील प्रवाहामुळे देशातील गुंतवणूकदार मजबूत होत आहेत या सर्व घडामोडींचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारातील कामगिरीवर झाला आहे. यामध्ये बीएसई मिडकॅप 0.9 टक्के तर स्मॉलकॅपचा निर्देशांक हा 0.29 टक्क्यांनी बंद झाला आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर 128.33 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 0.17 टक्क्यांच्या तेजीसह 74,611.11 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 43.35 अंकांनी वधारुन निर्देशांक हा 22,648.20 वर बंद झाला आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील पॉवरग्रिड कॉर्प, एशियन पेट्स, टाटा मोर्ट्स, टाटा स्टील, एनटीपीसी, सनफार्मा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक, टाटा कंसल्टेंसी, आणि जेएसडलब्लू स्टील यांचे समभाग हे लाभात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग हे नुकसानीत राहिले आहेत.

जागतिक संकेत :

जागतिक पातळीवरील घटनांमध्ये आशियातील अन्य बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग हा लाभात राहिला. तर दक्षिण कोरियाचा कॉस्पी , जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हा नुकसानीत राहिला आहे. युरोपमध्ये मात्र बुधवारी मिळता जुळता कल राहिला होता. अमेरिकन बाजार वॉल स्ट्रीटमध्ये बुधवारी काहीसे मिळतेजुळते वातावरण राहिले होते. जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 1.02 टक्क्यांनी वधारुन 84.29 डॉलर प्रति बॅरेल राहिले आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थाकडून गुंतवणूकदारांनी मंगळवारी 1,071.93 कोटी रुपये किंमतीच्या समभागांची खरेदी केली आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article