पहिल्या सत्रात सेन्सेक्स 326 अंकांनी प्रभावीत
गुंतवणूकदारांची सावध भूमिका : बाजारात पुन्हा व्याजदर वाढीचे ढग
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील पहिल्या सत्रात सोमवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. यामध्ये अगोदरच्या दिवशी रविवारी लक्ष्मीपुजनाच्या वेळी काही वेळ झालेल्या ट्रेडिंगच्या दरम्यान मात्र बाजारात तेजीची उसळी राहिली होती.
सोमवारी मात्र चलन वाढीचे आकडेवारी सादर होण्याच्या अगोदरच गुंतवणूकदारांनी आपली सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान आयटी, आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागात विक्रीचा कल राहिल्याने बाजारात दबावाची स्थिती राहिली. दरम्यान जागतिक बाजारात मिळता जुळता कल राहिला होता.
बीएसई सेन्सेक्स 325.58 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 64,933.87 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 82.00 अंकांच्या नुकसानीसोबत 19,443.55 वर बंद झाले. व्यापक बाजारात बीएसई मिडकॅप
निर्देशांकात 0.10 टक्क्यांनी वधारले आहेत. स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.01 टक्क्यांनी नुकसानीत राहिले.
दिग्ग्ज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्समधील 7 समभाग हे वधारले आहेत. तर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, जेएसडब्लू स्टील, एनटीपीसी, इंडसइंड बँक, आणि पॉवर ग्रिडकॉर्प हे अव्वल स्थानी राहिले आहेत. नफा कमाईत महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग हे 0.90 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत.
या समभागांची घसरण
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामधील सेन्सेक्समधील 23 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग हे सर्वाधिक प्रभावीत झाले आहेत.
जागतिक पातळीवरील बाजारात आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी हा नुकसानीत राहिला. जपानचा निक्की, चीनचा शांघाय, कम्पोजिट व हाँगकाँगचा हँगसेंग हा तेजीत राहिला होता.