For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेन्सेक्सची मंगळवारी घसरण, 368 अंकांनी घसरला

07:00 AM Aug 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
सेन्सेक्सची मंगळवारी घसरण  368 अंकांनी घसरला
Advertisement

सेन्सेक्समधील 17 समभाग घसरणीत  : आशियाई बाजारात तेजी

Advertisement

मुंबई : भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी घसरणीसोबत बंद झाला. सेन्सेक्स 368 अंकांनी घसरणीत राहिला होता. सोमवारी शेअरबाजाराने चांगली तेजी कमावली होती. मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 368 अंकांनी घसरुन 80,236 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 98 अंकांनी घसरुन 24487 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 13 समभाग तेजीसोबत 17 बंद झाले तर 17 समभाग मात्र नुकसानीसोबत बंद झाले होते. बाजारात दिवसभरात चढ उतार पाहायला मिळाला.

ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीचे समभाग 2 टक्के इतके वाढले होते. टेक महिंद्रा, महिंद्रा आणि महिंद्रा व एनटीपीसी यांचे समभागही तेजीत होते. बजाज फायनान्सचा समभाग 3 टक्के इतका घसरणीत होता. याशिवाय ट्रेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक आणि झोमेटो (इटर्नल) चे समभाग 1.4 टक्के इतके घसरलेले हेते. निफ्टीतील समभागांची कामगिरी पाहता 50 समभागांमध्ये 17 समभाग तेजीसमवेत बंद होण्यात यशस्वी झाले होते तर उर्वरीत 33 समभाग मात्र नुकसानीसोबत बंद झाले.  निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास मेटल, फार्मा, आयटी आणि मीडिया यांची कामगिरी सकारात्मक दिसली तर एफएमसीजी, बँकिंग व रियल्टी निर्देशांक मात्र घसरणीत बंद झाले.

Advertisement

जागतिक बाजारात आशियाई बाजारांची कामगिरी चांगली झाली. आशियाई बाजारात पाहिल्यास जपानचा निक्केई 2.15 टक्के वाढत 42,718 च्या स्तरावर तर कोरीयाचा कोस्पी 0.53 टक्के घसरत 3190 वर बंद झाला होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.25 टक्के वाढत 24,970 च्या स्तरावर तर चीनचा शांघाय कंपोझीट 0.50 टक्के वाढत 3665 वर बंद झाल्याचे कळते. 11 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील डोव्ह जोन्स 0.45 टक्के घसरत 43,975 स्तरावर बंद झाला. नॅसडॅक कंपोझीट 0.30 टक्के घसरत 21385 वर तर एस अँड पी-500 0.25 टक्के घसरत 6373 वर बंद झाला. 11 ऑगस्टला देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 6 हजार कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. तर विदेशी गुंतवणूकदारांनी कॅश सेगमेंटमध्ये 1202 कोटी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 5972 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी 15,221 कोटी रुपयाचे समभाग विकले. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 42,767 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

समभाग वधारलेल्या कंपन्या

  • मारुती सुझुकी    12842
  • टेक महिंद्रा         1509
  • महिंद्रा-महिंद्रा     3236
  • एनटीपीसी          340
  • टाटा स्टील         160
  • टायटन              3488
  • सनफार्मा            1622
  • अल्ट्राटेक सिमेंट  12471
  • एचसीएल टेक     1499
  • लार्सन अॅण्ड टुब्रो 3686
  • टाटा मोटर्स        653
  • हिरोमोटो           4645
  • सिप्ला               1520
  • बीपीसीएल         323

समभाग  घसरलेल्या कंपन्या

  • बजाज फायनान्स 852
  • ट्रेन्ट                   5370
  • हिंदुस्थान युनि     2484
  • एचडीएफसी बँक 1969
  • इटरनल                305
  • आयसीआयसीआय  1422
  • बजाज फिनसर्व्ह  1905
  • भारत इले.          380
  • कोटक महिंद्रा     1958
  • अदानी पोर्टस      1330
  • रिलायन्स इंडस्ट्रीज  1380
  • स्टेट बँक            820
  • एशियन पेन्ट्स     2478
  • अॅक्सिस बँक      1069
  • भारती एअरटेल   1850
  • टीसीएस             3035
  • इन्फोसिस           1426
  • आयटीसी           416
  • पॉवरग्रिड कॉर्प    284
  • श्रीराम फायनान्स  611
  • ब्रिटानिया           5340
  • टीव्हीएस मोटर   2960
  • कोलगेट            2200
  • बँक ऑफ बडोदा 243
  • जेएसडब्ल्यू स्टील 1049
  • जिओ फायनान्स  327
  • आयशर मोटर्स    5659
  • फेडरल बँक       196
Advertisement
Tags :

.