सेन्सेक्स घसरला, निफ्टी मात्र सावरला
अमेरिका-चीन व्यापारी चर्चेचा परिणाम : गुंतवणूकदारांचा वित्तीय समभागांमध्ये नफा कमाई
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील दुसऱ्या दिवशीच्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्समध्ये काहीशी घसरण झाले. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारात तेजीची झुळूक राहिली होती. दरम्यान अमेरिका-चीन या देशांमध्ये व्यापारी चर्चेतील सकारात्मक बातम्या आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सकारात्मक पाठिंब्यामुळे बाजारात संतुलन स्थिती राहिल्याचे दिसून आले. दिवसभरातील ट्रेडिंगच्या वेळी गुंतवणूकदारांनी वित्तीय समभागांमध्ये नफा कमाई केल्याचा परिणामही बाजारावर झाला आहे.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी, बीएसई सेन्सेक्स 82,643 वर उघडला. परंतु दिवसअखेर तो 53.49 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 82,391.72 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 1.05 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 25,104.25 वर बंद झाला आहे.
भारतीय बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 0.4 टक्क्यांनी वाढले, परंतु नंतर ही वाढ कमी होत गेली. याशिवाय, निफ्टी स्मॉलकॅप 100 आणि निफ्टी मिडकॅप 100 मध्येही वाढ दिसून आली. निफ्टी स्मॉलकॅप 100 0.1 टक्के वधारला तर निफ्टी मिडकॅप 100 0.01 टक्के वधारला.
विविध कंपन्यांपैकी ग्रासिम इंडस्ट्रीजने 3.82 टक्के वाढीसह कामगिरी केली आहे. यानंतर डॉ. रे•ाrजमध्ये 2.26 टक्के, टाटा मोटर्समध्ये 2.02 टक्के, टेक महिंद्रामध्ये 2.02 टक्के आणि इन्फोसिसमध्ये 1.47 टक्के इतकी तेजी राहिली आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टीत एशियन पेंट्समध्ये 1.3 टक्के, बजाज फायनान्सचा समभाग 1.15 टक्के वधारला, टाटा स्टील 1.05 टक्के वधारला आणि बजाज फिनसर्व्हमध्ये 0.96 टक्क्यांनी वाढ दिसून आली.
या क्षेत्रांची कामगिरी
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांनी मिश्र कामगिरी केली आहे. यात निफ्टी रिअॅल्टीमध्ये सर्वात जास्त 1.14 टक्के घसरण झाली. त्यानंतर, निफ्टी इंडिया टुरिझम 0.76 टक्के, निफ्टी कॅपिटल मार्केट 0.59 टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 0.47 टक्के घसरले. दुसरीकडे, निफ्टी आयटीमध्ये सर्वात जास्त 1.67 टक्के वाढ झाली. त्यानंतर, निफ्टी मीडिया 1.09 टक्के, निफ्टी इंडिया डिफेन्स 1.07 टक्के, निफ्टी फार्मा 0.56 टक्के वाढला.