सेन्सेक्स घसरणीत, निफ्टी सावरला
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम : आशिया बाजारात सकारात्मक स्थिती
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील गुरुवारचे सत्र बुधवारच्या एक दिवसाच्या नाताळ सणाच्या सुट्टीनंतर सुरु झाले. यामध्ये प्रारंभीची तेजी गमावत बाजारात सेन्सेक्स बंद झाला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणतेही प्रमुख ट्रिगर पॉइंट प्राप्त न झाल्यामुळे, बाजार काहीसा डळमळीत व्यवहार करत राहिला आणि शेवटी सेन्सेक्स नुकसानीत तर निफ्टी तेजीसह बंद झाल्याचे दिसून आले.
दरम्यान गुरुवारी आशियाई बाजारातील मजबूत संकेत आणि गिफ्ट निफ्टीच्या सुस्त कामगिरीमुळे देशांतर्गत इक्विटी बाजार तेजीत उघडले. पण घसरणीत बंद झाले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 78,557.28 अंकांवर उघडला. तो खुल्या स्थितीत 78,851.92 अंकांवर पोहोचला. परंतु ही तेजी कायम ठेवण्यात सेन्सेक्सला अपयश येत सेन्सेक्स दिवसअखेर 0.39 अंकांनी प्रभावीत होत 78,472.48 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा सकाळच्या सत्रात वधारला मात्र अंतिमक्षणी निफ्टी 22.55 अंकांच्या किरकोळ वाढीसह 23,750.20 वर बंद झाला.
सेन्सेक्समध्ये 30 कंपन्यांपैकी अदानी पोर्ट्सचा समभाग 5 टक्केपेक्षा जास्त बंद झाला. स्टेट बँक ऑफ इंडिया, मारुती, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, कोटक बँक, अल्ट्रा सिमेंट्स आणि पॉवरग्रिड यांचे समभाग सर्वाधिक वाढले. दुसरीकडे टायटनचा समभाग सर्वाधिक घसरला. याशिवाय एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, नेस्ले, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स तोट्यात बंद झाले. दरम्यान, मंगळवारी सलग सातव्या सत्रात विदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत समभागांची निव्वळ विक्री केली. त्याने 288 दशलक्ष डॉलर किमतीचे इक्विटी शेअर्स विकले. दरम्यान, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी सलग सहाव्या सत्रात 28.19 अब्ज रुपयांचे समभाग खरेदी केले.
जागतिक बाजारपेठेतून कोणते संकेत मिळतात?
जागतिक बाजारात आज तेजीचे वातावरण आहे. आशियाई बाजारात जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग इंडेक्स आणि चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्स तेजीत व्यवहार करत आहेत. त्याचबरोबर युरोपातील बहुतांश बाजारपेठांमध्येही वाढ दिसून येत आहे.
रुपया नेहमीच नीचांकी घसरतो
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबत नाही असे दिसून येत आहे. यूएस ट्रेझरींवरील उच्च उत्पन्न आणि बहुतेक आशियाई चलनांमध्ये घट झाल्यामुळे गुरुवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 85.24 वर व्यवहार करत होता. मंगळवारी तो 85.20 रुपयांवर बंद झाला.