सेन्सेक्स 964 अंकांनी कोसळला
अमेरिकन फेडरल निर्णयाचा बाजारावर मोठा प्रभाव : निफ्टीही 24,000 च्या खाली
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स मोठ्या घसरणीने बंद झाला. दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांहून अधिकनी प्रभावीत राहिले आहेत. इतकी घसरण अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या कडक टीकेनंतर अमेरिकन शेअर बाजाराला आलेल्या हादऱ्यामुळे झाली आहे. दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीमुळे बीएसई सेन्सेक्स 964.15 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 1.20 टक्क्यांसोबत 79,218.05 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टा 247.15 अंकांनी घसरून निर्देशांक 23,951.70 वर बंद झाला.
फेडरल रिझर्व्हचा व्याजदर कपातीचा निर्णय
यूएस फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्स कपात केली आहे. आता व्याजदर 4.25 टक्के ते 4.5 टक्के दरम्यान आहे. तथापि, फेडने संकेत दिले आहेत की पुढील व्याजदरही कपात होऊ शकते, त्यामुळे गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. फेडच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये अपेक्षित चार कपातीच्या तुलनेत 2025 मध्ये आणखी दोन कपात अपेक्षित आहेत. आशिया-पॅसिफिकमधील शेअर बाजारात गुरुवारी घसरण पाहायला मिळत आहे. वॉल स्ट्रीटवर मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानंतर ही घसरण झाली. दरम्यान, जपानवर लक्ष केंद्रित केले आहे, जिथे बँक ऑफ जपानने आपली दोन दिवसीय धोरण बैठक संपवली आणि व्याजदर 0.25 टक्केवर ठेवण्याचा निर्णय घेतला.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- सनफार्मा 1824
- हिंदुस्थान युनि 2360
- पॉवरग्रिड कॉर्प 321
- डॉ.रे•ाrज लॅब 1326
- ल्यूपिन 2162
- सिप्ला 1505
- बीपीसीएल 294
- आयओसी 139
- अपोलो हॉस्पिटल 7291
- एसआरएफ 2285
- एसबीआयलाईफ 1403
- आयशर मोटर्स 4770
- हिरोमोटो 4416
- फेडरल बँक 200
- कोलगेट 2786
- बजाज ऑटो 8972
समभाग घसरलेल्या कंपन्या
- बजाज फिनसर्व्ह 1590
- जेएसडब्लू स्टील 925
- एशियन पेन्ट्स 2292
- बजाज फायनान्स 6914
- आयसीआयसीआय 1289
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1230
- टीसीएस 4271
- इन्फोसिस 1948
- टाटा मोटर्स 744
- टायटन 3360
- एचसीएल टेक 1936
- टेक महिंद्रा 1755
- एनटीपीसी 337
- अॅक्सिस बँक 1110
- नेस्ले 2161
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 3015
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3712
- कोटक महिंद्रा 1761
- एचडीएफसी बॅँक 1793
- आयटीसी 466
- टाटा स्टील 143
- अल्ट्राटेक सिमेंट 11620
- स्टेट बँक 832
- मारुती सुझुकी 10955
- अदानी पोर्ट 1205