चौथ्या सत्रात सेन्सेक्सची 723 अंकांची पडझड
सलग दुसऱ्या दिवशी घसरणीचे सत्र : आयटीसीचे समभाग प्रभावीत : निफ्टीही घसरणीसह बंद
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय शेअर बाजारात सलगच्या दुसऱ्या दिवशी व सप्ताहातील चौथ्या दिवशी गुरुवारी बीएसई सेन्सेक्स तब्बल 723 अंकांनी पडझडीत राहिल्याचे दिसून आले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठीकीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये काही वेगळे निर्णय घेतले नाहीत. मात्र बाजारात मात्र आयटी व अन्य क्षेत्रातील कामगिरीमुळे बाजारात घसरणीची नेंद करण्यात आली आहे बाजारात आपली मजबूत स्थिती कायम ठेवणाऱ्या कंपन्यांमध्ये आयटीसीचे समभाग घसरले तर आरबीआयने रेपोदर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवल्याचा परिणाम म्हणून खासगी बँकांचे समभाग हे नुकसानीत राहिले होते. याचा परिणाम हा भारतीय बाजारातील कामगिरीवर नकारात्मक प्रभाव राहिला.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 723.57 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 71,428.43 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 212.55 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 21,717.95 वर बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये स्टेट बँकेचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.54 टक्क्यांनी वधारला आहे. तर पॉवरग्रिड कॉर्प, टीसीएस, एचसीएल टेक , भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, सनफार्मा आणि एनटीपीसी यांचे समभाग हे वधारुन बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये ब्रिटीश अमेरिकन टोबॅको आयटीसीमध्ये काही हिस्सेदारी विकणार असल्याच्या बातम्यांमुळे सिगरेपासून हॉटेल व्यवसायात कार्यरत असणाऱ्या कंपनीचे समभाग हे गुरुवारी 4 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासह कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, मारुती, एशियन पेन्ट्ससह 22 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- स्टेट बँक 699
- पॉवरग्रिड कॉर्प 276
- टीसीएस 4135
- एचसीएल टेक 1634
- भारती एअरटेल 1142
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2902
- सनफार्मा 1500
- एनटीपीसी 331
- मॅक्स हेल्थकेअर 870
- पीआय इंडस्ट्रीज 3454
- बँक ऑफ बडोदा 253
- बीपीसीएल 620
- झोमॅटो 144
- कोल इंडिया 459
- हिंडाल्को 601
- ल्यूपिन 1606
- हॅवेल्स इंडिया 1352
समभाग घसरलेल्या कंपन्या
- आयटीसी 414
- कोटक महिंद्रा 1730
- आयसीआयसीआ 989
- नेस्ले 2423
- अॅक्सिस बँक 1037
- इंडसइंड बँक 1477
- बजाज फायनान्स 6577
- अल्ट्राटेक सिमेंट 10021
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1687
- एचडीएफसी बँक 1403
- मारुती सुझुकी 10740
- एशियन पेन्ट्स 2929
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3337
- बजाज फिनसर्व्ह 1570
- जेएसडब्लू स्टील 824
- विप्रो 488
- टाटा मोर्ट्स 924
- टायटन 3549
- टेक महिंद्रा 1309
- टाटा स्टील 143
- हिंदुस्थान युनि 2417
- इन्फोसिस 1693
- ब्रिटानिया 4871
- आयशर मोर्ट्स 3809