For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

नफावसुलीच्या दबावामुळे सेन्सेक्स २५१ अंकांनी घसरणीत

06:05 AM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
नफावसुलीच्या दबावामुळे सेन्सेक्स २५१ अंकांनी घसरणीत
Advertisement

प्रमुख निर्देशांकांचा नुकसानीत समावेश : निफ्टीही 99.25 अंकांनी प्रभावीत

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी नफावसुलीच्या दबावामुळे बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. दरम्यान बाजारात मंगळवारी प्राप्त केलेल्या मोठ्या तेजीनंतर बाजारात नकारात्मक कल राहिल्याचा परिणाम दिसून आला.

त. भा. वृत्तसंस्था

Advertisement

मुंबई : प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 251.89 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 72,781.89 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 99.25 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 22,622.70 वर बंद झाला आहे.  निर्देशांकांवर नफावसुलीचा दबाव दिसून आला.  स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सवर कमी दबाव दिसून आला.

व्होलॅटिलिटी इंडेक्स सुमारे 3.6 टक्क्यांनी वाढून 14.63 वर बंद झाला. आयटी, एफएमसीजी आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी होऊनही बाजारात दबाव दिसून आला. त्याच वेळी, फार्मा आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार विक्रीची नोंद झाली.

एसबीआय सिक्युरिटीजचे टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्हज रिसर्च हेड, सुदीप शाह म्हणाले की, बुधवारी निफ्टी सुमारे 200 अंकांच्या मर्यादेत व्यवहार करत राहिला. गेल्या चार सत्रांमधील ही सर्वात कमी व्यवहार मर्यादा होती. मागील सत्रातील शॉर्ट-कव्हरिंग रॅलीनंतर, निर्देशांकाने आपली वाढ कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु ही रॅली टिकू शकली नाही आणि निफ्टी 0.43 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

गेल्या 11 ट्रेडिंग सत्रांपासून निफ्टी एका मर्यादेत राहिला असून, त्यात वर आणि खाली दोन्ही बाजूंनी तीव्र चढ-उतार दिसून येत आहेत. दैनिक चार्टवर एक बेअरिश कँडल तयार झाली आहे, ज्याच्या सावल्या वर आणि खाली दोन्हीकडे दिसत आहेत. हे या गोष्टीचे संकेत आहे की बाजाराला अद्याप दिशेबद्दल स्पष्ट आत्मविश्वास नाही.

कच्चे तेल-विक्रीचा तणाव

कच्चे तेल महाग झाल्याने आणि एफआयआयंकडून विक्रीमुळे तणाव पश्चिम आशियातील नव्याने निर्माण झालेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळेच ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 107 डॉलर्सच्या जवळपास पोहोचली आहे. दुसरीकडे, 13 ऑक्टोबर रोजी देशांतर्गत बाजारात सलग 13 सत्रांमध्ये विक्री झाली. तात्पुरत्या आकडेवारीनुसार, निव्वळ विक्री सुमारे 1305 कोटी रुपये होती.

एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमती ही चिंतेची प्रमुख बाब आहे. डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल 94-95 डॉलरच्या दरम्यान राहिला, तर ब्रेंटचा भाव 105 डॉलरच्या वर राहिला. भू-राजकीय तणावामुळे पुरवठ्याबाबतचा धोका कायम असून, त्यामुळे महागाई आणि आयात खर्चावर दबाव येत आहे.

Advertisement
Tags :

.