महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्स उच्चांकानंतर अंतिम क्षणी घसरणीत

06:43 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निफ्टी 26,000 च्या जवळ : टाटा स्टील, हिंडाल्को तेजीत

Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय शेअर बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी खुप चढउताराचे सत्र राहिले. यामध्ये इंट्रा डे ट्रेड दरम्यान, प्रथमच बीएसई, एनएसई सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने अनुक्रमे 85 हजार आणि 26 हजारांची पातळी ओलांडली. सत्रादरम्यान, सेन्सेक्सने 85,163.23 ची ऐतिहासिक उंची प्राप्त करत व्यवहार केला, तर निफ्टीने 26,000 ची पातळी ओलांडून विक्रमी उच्चांक गाठला.

एनएसईचा 50 शेअर्स असलेला निफ्टी-50 1.35 अंकांनी किंवा 0.01 टक्क्यांनी वाढून 25,940.40 वर बंद झाला. दरम्यान, 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स 14.57 अंकांनी किंवा 0.02 टक्क्यांनी घसरून 84,914.04 वर बंद झाला.

शेअर बाजाराने उच्चांक नोंदवला असेल, पण ही वाढ जास्त काळ टिकू शकली नाही आणि बाजार सपाट बंद झाला. याचे एक प्रमुख कारण म्हणजे एक्सचेंजेसमध्ये मोठा हिस्सा असलेल्या बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टी बँक 0.25 टक्क्यांनी घसरली. निफ्टी पीएसयू बँकेचे शेअर्स एकूण 0.86 टक्के आणि निफ्टी खासगी बँकेचे शेअर्स 0.28 टक्क्यांनी घसरले.

या क्षेत्रांमध्ये चमक

प्रमुख क्षेत्रांच्या कामगिरीत मंगळवारी धातू समभागांची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. निफ्टी धातू क्षेत्राचा निर्देशांक 2.97 टक्क्यांवर बंद झाला. याशिवाय निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, निफ्टी ऑइल अँड गॅस, निफ्टी फार्मा आणि निफ्टी मीडिया या क्षेत्रांचे निर्देशांक वाढून बंद झाले. निफ्टीवरील बँकिंग समभागांव्यतिरिक्त, रियल्टी, हेल्थकेअर आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभाग घसरले.

निफ्टी-50 च्या 50 समभागांपैकी एकूण 25 समभाग, तर सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 15 समभाग तेजीसह बंद झाले. निफ्टी-50 समभागांमध्ये टाटा स्टील सर्वाधिक तेजीत राहिला. याशिवाय हिंडाल्को, पॉवरग्रिड, टेक महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस, एचसीएल टेक, ओएनजीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, विप्रो आणि सनफार्मा या समभागांमध्ये वाढ झाली.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article