गुरुवारी सेन्सेक्स 592 अंकांनी घसरणीत
फेडरल रिझर्व्हने केली दर कपात, दिग्गज कंपन्यांचे समभाग घसरले
वृत्तसंस्था/मुंबई
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरामध्ये पाव टक्का कपातीची केलेली घोषणा भारतीय बाजारांवर फारसा परिणाम करू शकलेली नाही. भारतीय शेअर बाजार गुरुवारी घसरणीसोबत बंद झाला. जागतिक बाजारातही फेडरलच्या निर्णयाचा मिळताजुळता परिणाम पहायला मिळाला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 592 अंकांनी घसरत 84.404 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 176 अंकांनी नुकसानीसह 25877 च्या स्तरावर बंद झाला. आघाडीवरची उद्योग कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि खासगी क्षेत्रातील बँक, एचडीएफसी बँक या समभागांच्या कमकुवत कामगिरीमुळे शेअर बाजार काहीसा घसरणीत राहिला होता. निफ्टी दिवसभराच्या सत्रात 26032 अंक आणि 25845 या दरम्यान व्यवहार करताना दिसला. अपेक्षेप्रमाणे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी रात्री व्याजदरामध्ये पाव टक्का कपातीची घोषणा केली.
परंतु या घोषणेचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर विशेषत: दिसून आला नाही. बँकेचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी व्याजदर कपातीची घोषणा करतानाच 2025 ची ही शेवटची कपात असल्याचे संकेत दिल्यामुळे याचा परिणाम काहीसा नकारात्मक विविध बाजारांवर दिसला. देशांतर्गत कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल मिळतेजुळते आणि सेन्सेक्समध्ये फ्युचर आणि ऑप्शन्स एक्सपायरीमुळे शेअर बाजारात गुरुवारी चढउतार दिसून आला. गुंतवणुकदार ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चर्चेवर लक्ष ठेवून होते. सेक्सेक्समध्ये पाहता भारती एअरटेल, पॉवरग्रीड कॉर्प, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स यांचे समभाग घसरणीत होते. दुसरीकडे एलअँडटी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी आणि अदानी पोर्ट यांचे समभाग मात्र चांगल्या तेजीसोबत बंद झाले. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.1 टक्का वाढत आणि निफ्टी स्मॉल कॅप 100 निर्देशांक 0.1 टक्का घसरत बंद झाला. विविध क्षेत्राच्या कामगिरीकडे पाहता उर्जा निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक घसरणीत राहिले होते.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- कोल इंडिया 387
- लार्सन टूब्रो 3987
- भारत इले. 409
- हिंडाल्को 861
- नेस्ले 1279
- अल्ट्राटेक सिमेंट 12050
- मारुती सुझुकी 16206
- टाटा मोटर्स पीव्ही 412
- जेएसडब्ल्यू स्टील 1210
- अदानी पोर्ट 1456
- टायटन 3750
- जिओ फाय. 309
समभाग घसरलेल्या कंपन्या
सिप्ला 1540
डॉक्टर रेड्डीज लॅब्ज 1202
एचडीएफसी लाईफ 746
भारती एअरटेल 2066
इंटरग्लोब एव्हि. 5725
पॉवरग्रीड कॉर्प 291
टेक महिंद्रा 1433
बजाज ऑटो 8923
इन्फोसिस 1493
बजाज फिनसर्व 2114
रिलायन्स 1488
बजाज फाय. 1052
एचडीएफसी बँक 998
आयशर मोटर्स 6886
महिंद्रा अँड महिंद्रा 3502
मॅक्स हेल्थकेअर 1178
अपोलो हॉस्पिटल 7790
अॅक्सिस बँक 1238
ट्रेंट 4744
सन फार्मा 1702
एचयूएल 2469
टीसीएच 3035
आयटीसी 418
एनटीपीसी 345
कोटक महिंद्रा 2537
एशियन पेंटस् 2523
आयसीआयसीआय 1362
एसबीआय 934
अदानी एंट. 2523