महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्स 74,000 च्या नव्या विक्रमी उंचीवर

06:35 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निफ्टीही नव्या शिखरावर: बँक आणि आयटी क्षेत्राची चमक

Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्या निर्देशांकांनी नवा टप्पा प्राप्त करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. यामध्ये सेन्सेक्स तब्बल 74,000च्या उंचीवर पोहोचल्याचे पहावयास मिळाले. दिवसभरातील कामगिरीमध्ये बुधवारी प्रामुख्याने बँक आणि काही आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये झालेली खरेदी व युरोपीय बाजारांमधील स्थितीमुळे बाजार नवा विक्रम नेंदवत बंद झाला.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स बुधवारी सरतेशेवटी 408.86 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक 0.55 टक्क्यांसह 74,085.99 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 117.75 अंकांसोबत निर्देशांक 22,474.05 वर बंद झाला आहे. निफ्टीमधील 35 कंपन्यांचे समभाग हे वधारुन बंद झाले, तर घसरणीत 15 कंपन्यांचे समभाग राहिले आहेत.

मुख्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये कोटक बँकेचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 2.37 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. यासोबतच अॅक्सिस बँकेचे समभाग 2 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारले. तर भारती एअरटेल, सनफार्मा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टायटन, एचसीएल टेक, टीसीएस, आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले.

अन्य कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, मारुती सुझुकी, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवरग्रिड कॉर्प आणि टाटा मोर्ट्स यांचे समभाग हे प्रभावीत राहिले आहेत.

या कारणांमुळे तेजी

युरोपीय बाजारांमध्ये राहिलेली तेजी आणि बँक व आयटी यांच्या क्षेत्रांमधील चमकदार कामगिरीचा लाभ हा भारतीय शेअर बाजाराला मिळाला. या दरम्यान चढउताराची स्थिती राहिली होती, मात्र बाजाराने आपली पकड मजबूत ठेवली.

जागतिक पातळीवरील स्थिती

आशियामधील बाजारांमध्ये बुधवारी दक्षिण कोरियाचा सियोल, जपानचा टोकीओ आणि चीनचा शांघाय हे घसरणीत राहिले. हाँगकाँगचा बाजार मात्र नफा कमाईसह बंद झाला. युरोपीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article