For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुरुवारी सेन्सेक्स निफ्टी निर्देशांक घसरणीसोबत बंद

07:00 AM Apr 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुरुवारी सेन्सेक्स निफ्टी निर्देशांक घसरणीसोबत बंद
Advertisement

सेन्सेक्स 123 अंकांनी घसरणीत, डिफेन्स, मेटल व आयटी निर्देशांक फॉर्मात

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

गुरुवारी भारतीय शेअर बाजार अल्पशा घसरणीसोबत बंद होताना दिसला. सकाळच्या सत्रामध्ये शेअरबाजारात तेजी दिसून आली होती. मेटल व आयटी समभागांची खरेदी मोठ्या प्रमाणात झालेली पहायला मिळाली. दुसरीकडे ऑटो आणि प्रायव्हेट बँक यांचे निर्देशांक दबावात कमकुवत बंद होताना दिसले. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 123 अंकांनी घसरत 77988 च्या स्तरावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 35 अंकांनी घसरत 24196 अंकांवर बंद झाला. निफ्टीमधील 50 पैकी 27 समभाग घसरणीत होते तर सेन्सेक्समधील 30 पैकी 15 समभाग तेजीत तर 15 घसरणीसोबत बंद होताना दिसले.

Advertisement

समभागांची कामगिरी पाहता, अदानी एंटरप्रायझेस, हिंडाल्को आणि ट्रेंट हे सर्वाधिक तेजीत होते तर सर्वाधिक घसरणीमध्ये एचडीएफसी बँक, ओएनजीसी, एचडीएफसी लाईफ यांचा समावेश होता. इतर समभागांमध्ये अदानी पोर्टस, इटर्नल, मारुती सुझुकी, टाटा कंझ्युमर्स, टीसीएस, इन्फोसिस, नेस्ले, आयशर मोटर्स, बजाज फिनसर्व, एशियन पेंटस्, आयटीसी, मॅक्स हेल्थकेअर यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. घसरणीमध्ये दिग्गज कंपनी रिलायन्स, पॉवरग्रीड कॉर्प, इंडिगो, कोल इंडिया, बजाज फायनान्स, एसबीआय, टाटा मोटर्स पीव्ही, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, ग्रासिम, महिंद्रा आणि महिंद्रा, टायटन यांचा समावेश होता.

निर्देशांकांची कामगिरी

निफ्टी बँक निर्देशांक 215 अंकांच्या घसरणीसोबत 56086 अंकांवर बंद झाला होता. तर डिफेन्स निर्देशांक 1.64 टक्के, मेटल 1.53 टक्के व आयटी निर्देशांक 0.88 टक्के तेजीसोबत बंद झाले. यानंतर कॅपिटल मार्केट, कमोडिटीज, मीडिया, एनर्जी, एफएमसीजी, फार्मा, इन्फ्रा यांचे निर्देशांक मजबुतीसोबत बंद झाले. जागतिक बाजारामध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी 2.21 टक्के तेजीत होता. जपानचा निक्केई 2.38 टक्के आणि हाँगकाँगचा हॅगसेंग निर्देशांक 1.72 टक्के तेजीत होता. 15 एप्रिल रोजी अमेरिकेतील बाजारामध्ये मिळताजुळता कल पहायला मिळाला.

  • ट्रेन्ट                 4089
  • इटर्नल               252
  • अदानी पोर्ट        1549
  • भारत इले.          455
  • इन्फोसिस           1318
  • लार्सन अॅण्ड टुब्रो 4117
  • टाटा स्टील         210
  • टीसीएस            2577
  • एशियन पेन्ट्स     2437
  • बजाज फिनसर्व्ह  1835
  • अल्ट्राटेक सिमेंट  11828
  • टेक महिंद्रा         1490
  • आयटीसी           303
  • मारुती सुझुकी    13333
  • पीबी फिनटेक     1553
  • वरुण बेव्हरेज      461
  • पॉवर फायनान्स  459
  • वेदान्ता               728
  • इन्फो एज           1049
  • कोलगेट             1972
  • हॅवेल्स इंडिया      1293

  • एचडीएफसी बँक 795
  • टायटन कंपनी     4457
  • महिंद्रा-महिंद्रा      3223
  • भारती एअरटेल   1840
  • कोटक महिंद्रा     379
  • बजाज फायनान्स 906
  • हिंदुस्थान युनि     2141
  • इंटरग्लोब एव्ही.   4605
  • एनटीपीसी          390
  • अॅक्सिस बँक       1349
  • स्टेट बँक            1067
  • सनफार्मा            1693
  • आयसीआयसीआय  1345
  • पॉवरग्रिड कॉर्प       312
  • रिलायन्स इंडस्ट्रीज  1343
  • एचसीएल टेक     1450
  • हिरोमोटो           5160
  • ओएनजीसी         282
  • मॅरिको                744
  • अपोलो हॉस्पिटल 7555
  • ब्रिटानिया           5589
  • लुपिन                2322
Advertisement
Tags :

.