For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसोबत बंद, इराण-अमेरिका तणावाचा परिणाम

06:36 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
सेन्सेक्स निफ्टी घसरणीसोबत बंद  इराण अमेरिका तणावाचा परिणाम
Advertisement

शेअर बाजारासाठी 30 सप्टेंबर हा दिवस खूपसा अस्थिर होता.  बाजारात तेजी दिसली खरी पण अखेरीस तो घसरणीसह बंद 

Advertisement

त. भा. वृत्तसंस्था

मुंबई  : बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 48 अंकांनी घसरून 72,480 वर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक देखील 95 अंकांनी घसरून 22,620 वर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमती मात्र वाढीवच होत्या. विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजारावर दबावाचे वातावरण कायम राहिले.

Advertisement

सेन्सेक्समधील बरेचसे समभाग दबावासह बंद झाले. खाद्य क्षेत्रातील इटर्नल, औषध क्षेत्रातील सन फार्मा, बंदर क्षेत्रातील अदानी पोर्ट्स, घड्याळसह दागिने क्षेत्रात कार्यरत टायटन आणि वित्त क्षेत्रातील बजाज फायनान्स यांसारख्या समभागांनी अत्यंत निराशादायी कामगिरी करत बाजारावर दबाव वाढवला. घसरणीत पाहता आयशर मोटर्स, एचडीएफसी लाइफ, ट्रेंट, ग्रासिम इंडिया, डॉ. रे•िज लॅब्ज, बीएसई, इन्फोसिस, नेस्ले, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, अपोलो हॉस्पिटल, मॅक्स हेल्थकेअर, एशियन पेंटस्, जियो फायनॅन्शीयल यासारख्या कंपन्यांनी वाटा उचलला होता. दुसरीकडे, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडिगो, अॅक्सिस बँक आणि टीसीएस हे मात्र चांगल्या तेजीसह कार्यरत होते. बजाज ऑटो, लार्सन टुब्रो, टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, कोल इंडिया, एचसीएल टेक्नॉलॉजीस यांचे समभागही तेजीत होते. एनएसईवर मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांची खरेदी दिसून आली. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.01 टक्क्यांनी तर निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांकातही 0.20 टक्क्यांची तेजी दिसून आली.

विविध क्षेत्रांची कामगिरी

विविध क्षेत्रांची कामगिरी पाहिल्यास निफ्टी मीडिया निर्देशांक 2.55 टक्क्यांनी वाढत बंद झाला तर निफ्टी रिअल्टी, केमिकल्स, सिमेंट आणि प्रायव्हेट बँक निर्देशांक सुद्धा 1 टक्क्याने वाढलेले होते. निफ्टी ऑटो, आयटी, पीएसयू बँक आणि ऑइल अँड गॅस या निर्देशांकांनी वाढत बाजाराला आधार दिला. नकारात्मक कामगिरीत निफ्टी मेटल आणि फार्मा निर्देशांक यांचा समावेश होता. निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स 1 टक्क्यांहून अधिक घसरला. याव्यतिरिक्त, निफ्टी एफएमसीजी निर्देशांकही घसरणीत बंद झाला.

Advertisement
Tags :

.