सेन्सेक्स पुन्हा 1176 अंकांनी नुकसानीत
गुंतवणूकदारांना 18 लाख कोटींचा फटका : जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरणाचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेंड आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई fिनफ्टी 50 1 टक्क्यांहून अधिक नुकसानासह बंद झाले. सर्व क्षेत्रीय निर्देशांकही प्रभावीत होत बंद झाले. शेअर बाजारातील घसरणीचा हा सलग पाचवा दिवस होता. या पाच दिवसांत गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 4,41,09,605 कोटी रुपयांवर आले आहे.बीएसईमधील सेन्सेक्स दिवसअखेर 1176.46 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 1.49 टक्क्यांसोबत 78,041.59 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 364.20 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 23,587.50 वर बंद झाला.
सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 28 समभाग घसरणीसह बंद झाले. यामध्ये टेक महिंद्रा, एम अँड एम, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि टाटा मोटर्स हे सेन्सेक्समध्ये टॉप-5 मध्ये राहिले आहेत. यासोबतच, एसबीआय, टीसीएस, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, अदानी पोर्ट्स, पॉवरग्रिड, टाटा स्टील, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, एचयूएल, कोटक बँक, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, शेअर्स एचसीएल टेक मारुती, एशियन पेंट्स, आयटीसी आणि आयसीआयसीआय बँकेचेही नुकसान झाले. दुसरीकडे, सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी फक्त 2 समभाग वधारले आहेत. यात प्रामुख्याने नेस्ले इंडियामध्ये 0.12 टक्के आणि टायटनमध्ये 0.07 टक्के वाढून बंद झाला आहे.
शेअर बाजारात चौफेर विक्री
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी चौफेर विक्री झाली. निफ्टी रियल्टी, निफ्टी सिलेक्ट टेलिकॉम आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस 3 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सर्व क्षेत्रीय निर्देशांक नुकसानीसह बंद झाले. याशिवाय निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो आणि निफ्टी पीएसयू बँकांवरही वाईट परिणाम झाला आणि ते 2 टक्क्यांहून अधिक घसरले.निफ्टी 50 चे 45 शेअर्स नुकसानासह बंद झाले. टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, अॅक्सिस बँक आणि ट्रेंट हे घसरणीत मुख्य राहिले होते. ज्यात 3.90 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. त्याच वेळी, डॉ. रे•ाrज लॅब, टायटन, नेस्ले इंडिया, एचडीएफसी लाइफ आणि आयसीआयसीआय बँक या केवळ 5 समभागांनी कमाल 1.49 टक्क्यांची वाढ नोंदवून उच्च पातळीवर बंद केले.