महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चौथ्या सत्रात सेन्सेक्स 75 हजार पार

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निफ्टीमध्येही तेजी : टेक महिंद्राची मजबूत कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

लोकसभा निवडणुकीचे निकालाच्या दरम्यान भारतीय शेअर बाजारात झालेल्या पडझडीमधून बाजार आता काहीसा सावरत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गुरुवारच्या चौथ्या सत्रात सेन्सेक्सने आपला 75 हजाराचा टप्पा पार केला आहे. यात सलग दुसऱ्या सत्रात बजाराने सकारात्मक कल प्राप्त केला होता. दरम्यान आता गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळत असून याचा लाभ येत्या काळात होणार असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 692.27 अंकांनी वधारुन निर्देशांक 75,074.51 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 201.05 अंकांच्या मदतीने तेजी प्राप्त करत 22,821.40 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये गुरुवारी टेक महिंद्राचे समभाग हे जवळपास 4.07 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासोबतच एचसीएल टेक , स्टेट बँक, इन्फोसिस, एनटीपीसी, टीसीएस, लार्सन अॅण्ड टुब्रो, विप्रो, भारती एअरटेल, टाटा स्टीलसह 23 कंपन्यांचे समभाग हे फायद्यात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँकेसह 7 कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले.

यामुळे बाजार चमकला

लोकसभा निवडणुकीतून बाजार सावरला असून पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार असल्याने गुंतवणुकदारांमधील चिंता काहीशी कमी झाली आहे. यामुळे बाजारात लिलाव दिसून आला आहे. बाजाराचे निवडणूक निकालाकडे आता दुर्लक्ष झाले असल्याने बाजार नव्याने भरारी घेत आहे.

नव्या सरकारकडे नजर

आता आगामी आठवड्यातील घडमोडींकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागून राहणार आहेत. कारण येत्या 8 जून रोजी केंद्रात नवीन सरकार स्थापन होणार आहे. यामुळे नवीन ध्येय धोरण व सादर होणार पूर्ण अर्थसंकल्प त्यामधील तरतूदी या बाबींवर येणाऱ्या काळात बाजारांची दिशा स्पष्ट होणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article