For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur crime | सोलापूर जिल्ह्यात 'हनी ट्रॅप'चा खळबळजनक प्रकार; व्हिडिओ शुटींग करून २ लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक

04:03 PM Apr 24, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime   सोलापूर जिल्ह्यात  हनी ट्रॅप चा खळबळजनक प्रकार  व्हिडिओ शुटींग करून २ लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक
Advertisement

                                                          सोलापुरात ‘हनी ट्रॅप’ प्रकरण उघड

Advertisement

सोलापूर - शरीर संबंध करण्यास प्रभावित करून त्याचे व्हिडीओ शुटींग करून लाकडाने मारहाण करून डांबून ठेऊन दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह चौघांवर कुर्दुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, या घटनेवरून हनी ट्रॅपचे लोण आता शहरी भागातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचले असल्याचे दिसून येते.

याबाबत अलिशा शाहबाज खान (वय २०, रा. अंबाड, ता. माढा) या महिलेच्या फिर्यादीवरुन एक महिला, दिलीप भालके, रणधीर भालके, विक्रम सरबदे (रा. अंबाड, ता. माढा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील फिर्यादी अलिशा खान हीस २१ एप्रिल रोजी तिच्या ओळखीच्या एक महिला व एका यक्तीने अंबड येथील एका ठिकाणी आणून येथून कोठे जायचे नाही असा दम दिला. त्यामुळे घाबरलेल्या अलिशा खानने डायल ११२ वर कॉल करून पोलिसांची मदत मागितली. त्यावेळी पोलिसांनी अलिशा खानचा शोध घेऊन तिला कुडुवाडी पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडे चौकशीकेली. त्यावेळी रात्रीपासून अलिशाच्या पतीचादेखील ठावठिकाणा नसल्याचे समजले. पोलीस अलिशाकडे विचारपूस करीत असताना सायंकाळच्या सुमारास अलिशाचा पती हा अलिशाला दमदाटी करणाऱ्या व्यक्तींसोबत पोलीस ठाण्यात आला. सोबत आलेला व्यक्ती हा अलिशाच्या पतीला तुझ्या पत्नीला घेऊन चल असे वारंवार सांगत असताना पोलीसांनी अलिशाच्या पतीकडे हा काय प्रकार आहे याबाबत चौकशी केली.

Advertisement

त्यावेळी यातील एका महिलेने अलिशाच्या पतीला तू मला खूप आवडतो असे म्हणून सायंकाळी भेटायला ये असे म्हणून बोलावून घेतले. त्यानंतर त्या महिलेने अलिशाच्या पतीला व त्याच्या मित्राला एका शेतात घेऊन जाऊन  त्यांच्यासोबत शरीरसंबंध करण्यास प्रवृत्त केले आणि त्याचे मोबाईलमध्ये शुटींग करून घेतले. त्यानंतर तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो असे म्हणून त्यांना पोलीस ठाण्याला घेऊन जातो, असे म्हणून अंबाड येथील बंद पडलेल्या दुकानात घेऊन जाऊन दिलीप भालके व रणधीर भालके यांनी बांबू व पाईपने मारहाण केली. बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर दोन लाख रुपये दे, असे म्हणून त्याठिकाणी डांबून ठेवले. तसेच विक्रम सरवदे याने तेथे येऊन पैसे देणार नसेल तर एक-दोन वर्ष विलास कापरे याच्या भट्टीवर काम करावे लागेल तसेचतुझ्या पत्नीला हॉटेलवर काम करावे लागेल असे सांगून दमदाटी केली. हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीसांनी तत्काळ महिलेसह चौघांनाही ताब्यात घेऊन याबाबत कुर्दुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर अधिक्षक प्रीतम यावलकर, सहायक पोलीस अधिक्षक अंजना कृष्ण व्ही एस यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, हवालदार भोसले, गोरे, शिंदे, महिला कर्मचारी देशमुख, पटाईत, पठाण यांनी केली.

Advertisement
Tags :

.