महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेत सिनेर विजेता

06:19 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नदालला हरवून सर्बियाचा जोकोविच तिसरा

Advertisement

वृत्तसंस्था/ रियाद (सौदी अरेबिया)

Advertisement

सिक्स किंग्ज स्लॅम प्रदर्शनीय पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनेरने विजेतेपद पटकाविताना स्पेनच्या कार्लोस अल्कारेझचा पराभव केला. या स्पर्धेत सर्बियाच्या माजी टॉप सिडेड जोकोविचने तिसरे स्थान मिळविताना स्पेनच्या राफेल नदालचा पराभव केला. या स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या सिनेरने 60 लाख डॉलर्सची कमाई केली.

या प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात सिनेरने अल्कारेझचा 6-7 (5-7), 6-3, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. तर तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात जोकोविचने स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदालचा 6-2, 7-6 (7-5) असा पराभव केला. आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातील या दोन महान टेनिसपटूंमधील हा शेवटचा सामना पाहण्याची संधी शौकीनांना लाभली होती. जोकोविच आणि नदाल यांनी आतापर्यत 46 ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एकेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत. नदालने 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली असून तो पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेनंतर टेनिस क्षेत्रातून निवृत्त होणार आहे. अल्कारेझने चालू महिन्याच्या प्रारंभी झालेल्या चायना खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविताना सिनेरचा पराभव केला होता. सिनेर आणि अल्कारेझ यांच्यात आतापर्यंत 10 सामने झाले असून त्यापैकी 6 सामने अल्कारेझने तर 4 सामने सिनेरने जिंकले आहेत. या स्पर्धेतील टेनिसपटूंच्या कामगिरीचा एटीपी क्रमवारीसाठी विचार केला जात नाही. कारण सदर स्पर्धा प्रदर्शनीय म्हणून सौदी अरेबियात भरवली गेली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article