महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकन ओपनमध्ये सिनेर अजिंक्य

06:58 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद, स्पर्धा जिंकणारा इटलीचा दुसरा खेळाडू

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

इटलीच्या जेनिक सिनेरने वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळविताना अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्याने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा पराभव केला.,

23 वर्षीय सिनेर फ्रिट्झवर 6-3, 6-4, 7-5 अशी मात केली. तो सध्या जागतिक क्रमवारीत सिनेर अग्रस्थानावर असून त्याने या मोसमात एकूण सहा स्पर्धा जिंकल्या आहेत. अत्यंत फलदायी ठरलेल्या या वर्षात त्याने 4105 मानांकन गुण मिळविले असून त्याचा जवळचा प्रतिस्पर्धी अलेक्झांडर व्हेरेव्हशी वर्षअखेरच्या एटीपी नंबर वनसाठी चुरस सुरू आहे. फ्रिट्झने प्रतिकाराचे जोरदार प्रयत्न केले तरी सिनेरचेच सामन्यावर पूर्ण वर्चस्व राहिले. तिसऱ्या सेटमध्ये फ्रिट्झला चांगली संधी मिळाली होती. तो 5-3 असे आघाडीवर होता. पण सिनेरने सलग चार गेम्स जिंकत सेटसह जेतेपदही पटकावले.

2006 नंतर प्रथमच अमेरिकन खेळाडू या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत असल्याने स्थानिक प्रेक्षकांचा टेलर फ्रिट्झला जोरदार पाठिंबा मिळत होता. पण शांत व नियंत्रित खेळाला अचूक सर्व्हिस व बेसलाईनवरील सफाईदार फटक्यांच्या जोरावर सिनेरने वर्चस्व निर्माण करीत बाजी मारली. याशिवाय त्याने केवळ 21 अनियंत्रित चुका केल्या. कारकिर्दीतील पहिली दोन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे एकाच मोसमात पटकावणारा सिनेर हा 47 वर्षांनंतरचा पहिला टेनिसपटू बनला आहे. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने फ्रेंच ओपन व विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असल्याने 23 किंवा त्याहून कमी वयाच्या खेळाडूंने सर्व चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याची देखील 1993 नंतरची ही पहिली वेळ आहे. एकाच मोसमात हार्डकोर्टवरील ऑस्ट्रेलिया व अमेरिकन ओपन जिंकणारा तो चौथा टेनिसपटू आहे. याआधी मॅट्स विलँडर, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच यांनी हा मिळविला आहे. याशिवाय यूएस ओपन स्पर्धा जिंकणारा तो व एकंदर दुसरा इटालियन खेळाडू आहे. यापूर्वी 2015 मध्ये फ्लाव्हिया पेनेटाने ही स्पर्धा जिंकली होती.

‘नवे खेळाडू चॅम्पियन्स बनणे खेळाच्या दृष्टीने योग्यच आहे. नव्या जनरेशनचे आम्ही तरुण खेळाडू एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करीत सुधारणा करण्याचाही प्रयत्न करीत असतो,’ असे सिनेर म्हणाला. ट्रॉफी वितरणप्रसंगी त्याने कृतज्ञता व्यक्त करीत आजारी असलेल्या आपल्या आँटीला जेतेपद समर्पित केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article