For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ वैज्ञानिक अय्यंगार यांनी तयार केले एआय ॲप

11:07 AM Apr 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्येष्ठ वैज्ञानिक अय्यंगार यांनी तयार केले एआय ॲप
Advertisement

स्वयंअध्ययनासाठी पदवी विद्यार्थ्यांना उपयुक्त

Advertisement

बेंगळूर : ज्येष्ठ वैज्ञानिक एस. एस. अय्यंगार यांनी बीए, बी. कॉम, बी. एससी, इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अनुकूल व्हावे यासाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून एआय ॲप विकसित केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी मदत होईल. गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना एस. एस. अय्यंगार म्हणाले, एआय ॲपची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शिक्षण अधिक प्रभावी होईल. राज्यातील उच्च शिक्षण विभागात तंत्रज्ञानाच्या वापराला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याच्या मदतीने आवश्यक असणारी अध्ययन सामग्री आणि उत्तरे सहज उपलब्ध होतील.

सदर ॲप व्हॉट्सॲप आणि डेस्कटॉपवर वापरता येणार आहे. सेवेच्या दृष्टीकोनातून हे ॲप तयार केले आहे. लाखो अक्षरे कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडली असून राज्य शिक्षण खात्याकडून बीए, बी. कॉम, बी. एससी आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी प्रोत्साहित केले जाईल. या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील हुशार तरुणांना उत्तम ज्ञान मिळू शकेल, अशी माहिती एस. एस. अय्यंगार यांनी दिली. आपण मूळचे टी. नरसीपूर तालुक्यातील हेम्मीगे येथील असून 1970 मध्ये अमेरिका युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले. राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माझ्याकडून मदत व्हावी, या उद्देशाने एआय तंत्रज्ञानाद्वारे स्वयंअध्ययनासाठी ॲप तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.