For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कोल्हापुरात स्वागत ! सतेज पाटील, समरजीत घाटगे स्वागताला

07:18 PM Sep 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कोल्हापुरात स्वागत   सतेज पाटील  समरजीत घाटगे स्वागताला
Sharad Pawar Kolhapur Samarjit Ghatge welcome
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सोमवारी दुपारी कोल्हापुरात आगमन झाले. हॉटेल पंचशील येथे आमदार सतेज पाटील, समरजीत सिंह घाटगे, आर. के. पोवार यांनी शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे सोमवारपासून तीन दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत.सोमवारी दुपारी पवार यांचे कोल्हापुरात आगमन झाले. हॉटेल पंचशील येथे आल्यावर आमदार सतेज पाटील,माजी महापौर आर.के. पोवार, शाहू उद्योग समूहाचे समरजीतसिंह घाटगे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उद्योगपती व्ही.बी.पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

आणि मध्येच पोलीस व्हॅन बंद पडली
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाहनांचा ताफा ताराराणी चौकातून पंचशील हॉटेलकडे येत होता. पंचशील हॉटेलच्या दारात ताफ्यातील पोलीस व्हॅन रस्त्यातच बंद पडली. बराच वेळ प्रयत्न करूनही व्हॅन सुरू झाली नाही. यामुळे पवार यांच्या कार सह अन्य वाहने बंद पडलेल्या व्हॅनच्या डाव्या बाजूने पुढे काढून पंचशील हॉटेल येथे आणली गेली .

Advertisement
Advertisement
Tags :

.