कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक नंदकुमार मोहिते यांचे निधन
रत्नागिरी :
रत्नागिरीतील कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते, एक ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार मोहिते यांचे आज गुरुवारी सकाळी मुंबई येथे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
येथील समाजमनात एक आगळ वेगळं व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते. शिक्षण महर्षी, कुळ कायद्याचे अभ्यासक , शिवारआंबेरे येथील शामरावजी पेजे महाविद्यालयाचे संस्थापक व अध्यक्ष,ओबीसी समाजाचे अभ्यासक, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा, बळीराज सेनेचे सरचिटणीस अशा अनेक सामाजिक, राजकीय पदांवर ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे.
उद्या दिनांक 7 मार्च रोजी सकाळी ७.००ते ९.०० वाजता अंतिम दर्शनासाठी श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाच्या शिक्षण संकुलामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.०० ते १०.०० वाजता त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल व त्यानंतर राहत्या घरातून अंत्यविधीसाठी निघण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.