जेष्ठ पत्रकार, निवेदक किशोर गावडे यांचे निधन
चौके/वार्ताहर
मालवण चौके येथील मूळ रहिवासी व सध्या राहणार मुंबई भांडुप येथील जेष्ठ पत्रकार, कब्बड्डीपटू, उत्कृष्ट समालोचक श्री किशोर दादू गावडे (61) यांचे शनिवारी पहाटे झोपेतच हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद अकाली निधन झाले. किशोर गावडे यांनी तरुणपणतच स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले होते. ते मुंबई भांडुप साई हिल टेम्बीपाडा येथे वास्तव्यास होते.तरुणपणी नामांकित कबड्डीपटू म्हणून कब्बड्डी क्षेत्रात दबदबा होता.भांडुप परिसरात उत्कृष्ट निवेदक म्हणून कार्यरत होते. भांडुप परिसरातील सर्व कोकणी महोत्सव ,मोठमोठे इव्हेंट, क्रीडा स्पर्धा यामध्ये निवेदक म्हणून आपली भूमिका पार पाडायचे.भांडुप परिसरात जेष्ठ पत्रकार म्हणून अनेक दैनिकात त्यांनी काम केलेय .समाजातील अनेकांन न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अग्रेसर असायचे.
किशोर गावडे आपल्या मूळ गावी आल्यावर सामाजिक कार्यात सहभागी असायचे. चौके गावचे ग्रामदैवत श्री देवी भराडी मंदिर कलशारोहणावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे तीन दिवस उत्कृष्ट निवेदन केले होते.
काही महिन्यापूर्वी किशोर यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले होते. किशोर यांनाही यापूर्वी हृदयविकाराचा त्रास झाल्याने त्यांची बायपास सर्जरी झाली होती. किशोर यांच्या पश्चात पत्नी ,अमेय अथर्व असे दोन मुलगे, सून नात,भावजय,चुलत भाऊ असा परिवार आहे.किशोर यांच्या अकाली निधनाने भांडुप सह चौके परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.