For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे अयोग्य मागणी; नातेवाईक थेट कार्यालयात घुसले अन्...!

11:38 AM Jun 02, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे अयोग्य मागणी  नातेवाईक थेट कार्यालयात घुसले अन्
Advertisement

                          सांगली एसटी कार्यालयात महिला कर्मचाऱ्याच्या छळाचा आरोप

Advertisement

सांगली: सांगली येथील राज्य परिवहनमहामंडळाच्या (एसटी) कार्यालयात महिला कर्मचाऱ्याच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एसटी च्या वर्धापनदिनी ही घटना घडल्याने आणि एका बरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याकडे अयोग्य आणि आक्षेपार्ह मागणी केल्याचा आरोप समोर आला असून, या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी सांगली येथील एसटी कार्यालयात कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ लिपिकाकडून तिलामानसिक त्रास दिला जात असल्याची चर्चा होती. अखेर संबंधित लिपिकाने महिलेकडे अश्लील स्वरूपाची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या महिलेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना व नातेवाईकांना सांगितला.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच संतप्त नातेवाईकांनी थेट एसटी कार्यालय गाठले. त्यांनी संबंधित बरिष्ठ लिपिकाला जाब विचारत त्याच्याशी धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांसमोरच हा प्रकार घडल्यानेकाही काळ कार्यालयीन वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, या प्रकरणानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या एसटीच्या कार्यालयातच महिला कर्मचारी सुरक्षित नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच कार्यस्थळी महिलांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची भूमिका काय होती, याबाबतही प्रश्रचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे..

Advertisement
Tags :

.