For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक भीतीच्या छायेखाली

12:31 PM Dec 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आचरा पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक भीतीच्या छायेखाली
Advertisement

चोरीचा छडा लावा ; जेष्ठ नागरिक संघातर्फे आचरा पोलीसांना निवेदन

Advertisement

आचरा | प्रतिनिधी

आचरा परीसरात वाढत्या चो-यांमुळे घरात एकट्या दुकट्या राहणारया जेष्ठ नागरिकांच्या घरात घुसून चोऱ्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे तातडीने चोरीचा छडा लावण्याची मागणी फेस्काॅन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीतर्फे गुरुवारी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचे अध्यक्ष अशोक कांबळी ,कार्यवाह जेएम फर्नांडिस बाबाजी भिसळे, सुरेश ठाकूर ,लक्ष्मण आचरेकर, प्रकाश पुजारे ,श्रीमती मनाली फाटक ,भिकाजी कदम आदी उपस्थित होते.

Advertisement

जेष्ठ नागरिक सेवा संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वायंगणी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने ओरबडून फरार झाले आहेत .तसेच यापूर्वी आचरा बाजारपेठेतील सुवर्णकार कारेकर यांच्या दुकानात चोरी करून चोरटे पसार झाले होते. त्यामुळे एकटे दुकटे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर पोलीसांकडून चोर पकडण्यासाठी कोणती कार्यवाही झाली याबाबतची माहिती ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सभेत प्रत्यक्ष उपस्थित राहून देण्यात यावी अशी लेखी विनंती आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांना ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात आली.

Advertisement
Tags :

.