आचरा ज्येष्ठ नागरिक संघाचा मेळावा २० रोजी
जीवन गौरव पुरस्काराचे होणार वितरण
आचरा प्रतिनिधी
फेस्कॉम या राज्यस्तरीय रजिस्टर्ड जेष्ठ नागरिक संघाला संलग्न असलेल्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचा वार्षिक स्नेहमेळावा व सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी लोकीक सांस्कृतिक भवन (सिरॉक हॉटेल) आचरा येथे आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षि या संघामार्फत परिसरात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तिचा गौरव केला जातो. या वर्षी त्यासाठी आचरा पिरावाडी येथील उद्योजिका सौ. मिताली प्रशांत कोरगांवकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवान पुष्प गुच्छ देऊन या मेंबन्यात गौरविण्यात येणार आहे
सकाळी ९ ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणाऱ्या या मेळाव्याची सुरुवात ज्येष्ठ महिलांनी गाईलेल्या स्वागत गीताने होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक, उद्घाटन, वाढदिवस शुभेच्छा अहवाल वाचन पाहुण्यांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत, सभासदांसाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मालवण येथील डॉ. सुभाष दिघे हे उपस्थित राहून ज्येष्ठांना मार्गदर्शन करख्यात करणार आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाच्या 'स्वरयात्रा' या युनिटकडून गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यानंतर होणाऱ्या वार्षिक सभेला नविन कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. सुरेश ठाकूर गुरुजी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मेळाव्याला ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीच्या सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन संघाच्या कार्यकारिणी तर्फ करण्या आले आहे