For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव रेल्वे स्थानकात ज्येष्ठ-दिव्यांग प्रवाशांची परवड

11:11 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव रेल्वे स्थानकात ज्येष्ठ दिव्यांग प्रवाशांची परवड
Advertisement

इलेक्ट्रिक वाहन धुळखात : सेवा पूर्ववत करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी बॅटरीवर चालणारे वाहन उपलब्ध करून देण्यात आले होते. यामुळे ज्येष्ठ व दिव्यांगांना रेल्वेपर्यंत पोहोचणे सोईचे होत होते. परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून हे वाहन बंद असून, प्रवाशांची परवड होऊ लागली आहे. देखभाल व दुरुस्ती वेळेच्यावेळी होत नसल्याने हे वाहन धुळखात पडले आहे. नैऋत्य रेल्वेने बेळगावसह हुबळी, धारवाड, वॉस्को व इतर महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर काही वर्षांपूर्वी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून दिली होती. मध्यंतरी हुबळी येथे या वाहनाचा अपघात झाल्यानंतर सेवा थांबविण्यात आली होती. प्रशिक्षीत चालक मिळाल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून बेळगावमध्ये नव्याने ही सेवा सुरू झाली. प्रवाशांना अत्यंत माफक दरामध्ये प्रवेशद्वारापासून प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचणे सोयीचे होत होते. सध्या फुटओव्हर ब्रिजचे काम सुरू असल्याने प्रवाशांना अधिकच गरज भासत होती. परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून ही सेवा पुन्हा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. झेडआरयुसीसीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनीही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या गैरसोयीबद्दल तक्रार केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.