महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन

07:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वयाच्या 111 व्या वषी घेतला अखेरचा श्वास

Advertisement

वृत्तसंस्था/लखनौ

Advertisement

भारतीय जनता पक्षाचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन झाले आहे. उत्तर प्रदेशातील कप्तानगंज येथे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता वयाच्या 111 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकालीन आजारांमुळे सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्यापासून ते पगार छपरा येथील त्यांच्या घरी ऑक्सिजनवर होते. कोविड काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर भुलाई भाई प्रसिद्धीच्या झोतात आले होते. गुरुवारी त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत श्रद्धांजली वाहिली आहे.

श्री नारायण उर्फ भुलाई भाई हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते होते. ते जनसंघाच्या तिकिटावर आमदार झाले होते. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रेरणेने राजकारणात आल्यानंतर 1974 मध्ये कुशीनगरच्या नौरंगिया मतदारसंघातून दोनदा जनसंघाचे आमदार झाले. जनसंघाचे रुपांतर भाजपमध्ये झाल्यानंतरही ते पक्षाचे कट्टर कार्यकर्ते होते. 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आयोजित शपथविधी समारंभात भुलाई भाई यांना विशेष पाहुणे म्हणून लखनौ येथे आमंत्रित करण्यात आले होते. लखनौ येथील कामगार परिषदेत अमित शहा यांनी मंचावरून खाली उतरून त्यांचा गौरव केला होता. खांद्भगवा गमछा हीच भुलाईभाईंची ओळख होती.

सरकारी नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

भारतीय जनसंघाची स्थापना झाली तेव्हा श्री नारायण उर्फ भुलाई भाई एम.ए.चे विद्यार्थी होते. त्यावेळी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रभावाने राजकारणात आल्यानंतर ते त्यांच्या तत्त्वांना नेहमीच चिकटून राहिले. एम.ए.नंतर त्यांनी एम.एड् पदवी प्राप्त केल्यानंतर ते शिक्षणाधिकारी झाले. मात्र, 1974 मध्ये त्यांनी नोकरी सोडून राजकारणात रस दाखवत देश आणि समाजासाठी काहीतरी करण्याचे ठरवले. त्याचवषी भारतीय जनसंघाने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर भुलाई भाई आमदार झाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article