For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ कलाकारांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित

04:57 PM Dec 26, 2025 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ कलाकारांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित
Advertisement

                             श्री सेवागिरी महाराज पुण्यस्मरणार्थ संगीतमय बँड महोत्सव संपन्न

Advertisement

सोमवार : दिनांक 22 डिसेंबर रोजी परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ देवस्थान ट्रस्ट पुसेगाव व ग्रामस्थ यांच्या विद्यमानाने संपन्न झालेल्या यात्रेमध्ये विविध उपक्रम संपन्न होत असतात . येणेप्रमाणे यात्रा स्थळावरील कबड्डीच्या सुसज्ज अशा मैदानावर महाराष्ट्रातील नामांकित एकूण 12 बँड च्या सादरीकरणाचा दुग्ध शर्करा योग कला प्रेमींना अनुभवता आला .यामध्ये पुणे,मुंबई,बीड,सातारा,सांगली,कोल्हापूर भागातील नामांकित बँड पार्ट्यांनी सहभाग घेऊन अप्रतिम असे सादरीकरण केले

आजच्या धावपळीच्या युगामध्ये एकंदर समाज मन अस्थिर बनलेले आहे .अशा परिस्थितीमध्ये संगीत हे असं रसायन आहे की,तेच त्याच्यावरती रामबाण उपाय ठरू शकते. संगीत हाच सर्वोत्तम उपाय का ? तर संगीताला लय आहे ,संगीताला ताल आहे, संगीताला सूर आहे,संगीताला गंध आणि चव आहे म्हणूनच ते एकूण समाजमनाला आवडीचं वाटतं . हाच धागा पकडून देवस्थान ट्रस्टने संगीतमय बँडच्या सादरीकरणाचा उपक्रम राबवून हजारो रसिक - मनाला पर्वंनी उपलब्ध करून दिली .ती देत असताना सहभागी बँड कलाकारांनी उत्कृष्ट व योग्य प्रकारचा सादरीकरण करून प्रेक्षक वर्गांची वाहवा मिळवली .

Advertisement

.याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ज्या ज्या ज्येष्ठ कलाकाराने विशेष योगदान दिलेले आहे अशा कलाकारांना श्री सेवागिरी महाराज कला गौरव पुरस्काराने सन्मानित केले .त्यामध्ये पेरले तालुका कराड येथील चंदरमास्तर व कोरेगाव येथील प्रल्हाद माने यांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

तसेच या महोत्सवासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून जे नामांकित बॅन्ड कलाकार उपस्थित राहतात अशा मान्यवर कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले . .महोत्सवाचे यशस्वी आयोजन देवस्थान ट्रस्टचे चेअरमन व विश्वस्त ,ग्रामस्थ यांचे बरोबर सातारा जिल्ह्यातील सचिन वायदंडे,बाळासाहेब जाधव,आनंदराव भोंडवे,सुभाषराव अडागळे ,विलासराव माने,विठ्ठल माने , विशाल माने आदी बॅन्ड पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला .

Advertisement
Tags :

.