For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रा. पं. कर्मचाऱ्यांची माहिती जि.पं.कडे पाठवा

10:44 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रा  पं  कर्मचाऱ्यांची माहिती जि पं कडे पाठवा
Advertisement

माहिती न दिल्यास आंदोलनाचा इशारा : कर्नाटक राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियनची ता. पं.कडे मागणी

Advertisement

बेळगाव : ग्राम पंचायतींमध्ये लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई, स्वच्छता कर्मचारी या पदांवर अनेक कर्मचारी मागील काही वर्षांपासून कार्यरत आहेत. यातील काही शिक्षित असून काहींचे शिक्षण कमी आहे. या कारणास्तव त्यांना अद्याप अंतिम मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती तालुका पंचायतीने जिल्हा पंचायतीकडे वर्ग करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य ग्राम पंचायत युनियन (सीटू) ने निवेदनाद्वारे तालुका पंचायत अधिकाऱ्यांकडे केली आहे. ग्राम पंचायतींमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार त्या-त्या पदांसाठी कर्मचारी कार्यरत आहेत. 1994 च्या आदेशानुसार करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहावी शिक्षणाची अट होती तर वॉटरमन व शिपाई पदासाठी सातवीपर्यंतचे शिक्षण गरजेचे होते. परंतु 2008 च्या आदेशानुसार कॅशिअर, लिपिक पदासाठी किमान पीयुसी, वॉटरमनसाठी दहावी तर सफाई कामगारांसाठी सातवीपर्यंत शिक्षणाची अट घालण्यात आली.

अनेक वर्षांपासून कर्मचारी कार्यरत

Advertisement

मागील 15 ते 20 वर्षांपासून अनेक कर्मचारी ग्राम पंचायतींमध्ये कार्यरत आहेत. यापैकी ज्यांची शैक्षणिक अर्हता होती त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. परंतु अद्याप अनेक कर्मचारी नियुक्तीपासून दूर आहेत. 31-10-2017 रोजी अशिक्षित कर्मचाऱ्यांना समवर्ती मान्यता देण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार ता. पं. ने नियुक्ती नसलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा पंचायतीकडे देणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने कर्मचारी अडचणीत आले आहेत. तात्काळ सर्व माहिती जिल्हा पंचायतीकडे न दिल्यास आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी बेळगाव तालुक्यातील विविध ग्राम पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.