For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्याबाहेरून आलेल्या उमेदवाराला परत पाठवा

11:28 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्याबाहेरून आलेल्या उमेदवाराला परत पाठवा
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : सौंदत्ती येथे प्रचारसभा

Advertisement

बेळगाव : जिल्ह्याबाहेरून आलेले उमेदवार जगदीश शेट्टर यांना परत हुबळीला पाठवा. घरचा मुलगा असलेल्या मृणाल हेब्बाळकर यांना लोकसभेत पाठवून द्या, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. सौंदत्ती येथील न्यायालयीन आवारामध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार करून आयोजित प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या. जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देऊन या निवडणुकीत आपण सहभागी झालो आहोत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे आपले उद्दिष्ट आहे. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांकडून जिल्ह्याला आलेल्या योजना इतरत्र वळवून जिल्ह्याचा विकास खुंटविला आहे. त्यामुळेच बेरोजगारी वाढली आहे. येथील तरुणांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागत आहे. अशा उमेदवारांकडून पुन्हा लोकसभा निवडणूक लढविली जात आहे. मोदींचे नाव सांगून मते मागणाऱ्यांना योग्य धडा शिकविला पाहिजे. यावेळी काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना पाठिंबा देऊन बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. यावेळी आमदार विश्वास वैद्य, सौंदत्ती बार असोसिएशनचे अध्यक्ष संजू मत्तीन, कार्यदर्शी मंजुनाथ बडीगेर, वकील. व्ही. व्ही. हिरेमठ, वकील. आर. बी. शंकरगौड, वकील. जी. जी. कणवी, वकील. एस. एम. संगरेश आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.