For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेताळबांबर्डे गावच्या सौंदर्यात सेल्फी पॉईंटची भर

04:22 PM Apr 08, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वेताळबांबर्डे गावच्या सौंदर्यात  सेल्फी पॉईंटची भर
Advertisement

गावच्या स्वागत नाक्यावर सेल्फी पॉईंट ठरतोय लक्षवेधी

Advertisement

कुडाळ -

वेताळबांबर्डे येथील गावच्या स्वागत नाक्यावर वेतोबा क्रिकेट क्लब व श्री देवी पावणाई टेंब राधानृत्य मंडळ यांच्या कल्पनेतून आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.या गावच्या सौंदर्यात हा सेल्फी पॉईंट अधिक भर घालत आहे,तर गावच्या स्वागत नाक्यावरचा हा सेल्फी पॉईंट लक्षवेधी ठरत आहे. या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण सोहळा कुडाळ पं. स.चे सभापती मिलिंद नाईक, कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वेंगुर्केचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर - शिरवलकर,भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी करण्यात आला निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच शैलेश घाटकर, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ग्राम समितीचे अध्यक्ष प्रसाद गावडे, उपाध्यक्ष आनंद भोगले, ग्रामपंचायत सदस्य साजुराम नाईक, दशरथ कदम,डॉ राजन राणे, कानू शेळके, दिपक खरात, ग्रामपंचायत अधिकारी शालिनी कोकरे यांच्यासह वेतोबा क्रिकेट क्लबचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.वेताळबांबर्डे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व आदिशक्ती अभियानात केलेली कामगिरी कौतुकास्पद असून गावची एकी गावची खरी ताकद असल्याचे गौरवोद्गार सभापती श्री. नाईक यांनी काढले. तर ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावात केलेल्या सुधारणा व बदल संपूर्ण जिल्ह्यात लक्षणीय व चर्चेत असल्याचे गटविकास अधिकारी श्री.वालावलकर यांनी सांगितले. प्रास्ताविक अवधूत सामंत व प्रदीप गावडे यांनी केले, तर आभार प्रसाद गावडे यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.