शक्तीपीठ महामार्ग विरोधात गारगोटीत आत्मक्लेष आंदोलन
कोल्हापूर
राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्ग. या महामार्गामधील शेतकऱ्यांकडून या प्रकल्पाविरुद्घ होत असलेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होऊ लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाणार असल्याचा दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. यानंतर कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
आज कोल्हापुरातील गारगोटी येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस राष्ट्रवादी, शेकाप यांच्यासह शेतकऱ्यांकडून आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना ज्यांनी शक्तीपीठ व्हावं0 यासाठीचे निवेदन दिले, ती सरकारचीच माणस होती. असे म्हणत या आंदोलनाद्वारे तीव्र टीका करण्यात आली आहे. तसेच काहीही झाले तरी कोल्हापुरातून शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा ही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.