सेलेना गोमेज करणार विवाह
प्रियकर बेनी ब्लँकोसोबत थाटणार संसार
प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेज आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. तिने विवाहाची घोषणा केली आहे. प्रियकर बेनी ब्लँकोने तिला एंगेजमेंट रिंग परिधान केल्यावर तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. गायिकेने सोशल मीडियावर अनेक छायाचित्रे पोस्ट करत कायमस्वरुपासाठी आता सुरू अशी कॅप्शन दिली आहे.
सेलेना आणि ब्लँको हे एक वर्षापेक्षा अधिक काळापासून परस्परांना डेट करत ाहेत. दोघांनी आता एंगेजमेंटची घोषणा केली आहे. सेलेना आणि बेनी यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा 2023 मध्ये सुरू झाली होती. दोघेही अनेकदा एकत्र दिसून येत होते आणि परस्परांवर प्रेमाची उधळण करतानाची छायाचित्रे शेअर करत होते. सेलेना ही 32 वर्षीय असून बेनी हा 36 वर्षीय आहे.
सेलेनाच्या विवाहाच्या घोषणेनंतर टेलर स्विफ्टने आपण या सोहळ्यात फ्लॉवर गर्ल असू असे म्हटले आहे. जेनिफर अॅनिस्टन तसेच कार्डी बीने देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. बेनी ब्लँको हा अमेरिकन रिकॉर्ड प्रॉड्यूसर, गीतकार आणि लेखक आहे. सेलेना ही 8 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 42 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत.