सेलेना गोमेझ ठरली अब्जाधीश
वयाच्या 32 व्या वर्षीच केली कमाल
अमेरिकेतील अभिनेत्री, गायिका आणि उद्योजिका सेलेना गोमेझने कमी वयातच मोठे यश मिळविले आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार तिची मालमत्ता आता 1.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. अमेरिकेत स्वत:च्या बळावर ही कामगिरी करणारी सेलेना ही सर्वात कमी वयाच्या बिलेनियर्सपैकी एक आहे.
32 वर्षीय सेलेना गोमेझला गायन, ब्रँड पार्टनरशिप आणि अभिनयाच्या क्षेत्रातून चांगली कमाई प्राप्त होते, परंतु तिच्या मालमत्तेत एक मोठा हिस्सा तिची मेकअप कपंनी रेयर ब्यूटीचा आहे. सेलेना ही कंपनी 5 वर्षांपूर्वी सुरू केली होती. या कंपनीमुळे टेलर स्विफ्ट आणि रेहाना यासारख्या धनाढ्या महिलांच्या वर्तुळात तिची एंट्री झाली आहे.
सेलेना ही अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध गायिका मानली जाते. इन्स्टाग्रामवर तिचे 42.2 कोटी फॉलोअर्स आहेत. क्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनल मेसीनंतर इन्स्टाग्रामवर तिच सर्वाधिक लोकप्रिय आहे. तसेच तिने अनेक मोठ्या कंपन्यांसोबत अत्यंत महागडे करार केले आहेत. सेलेना ही बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे. याचमुळे तिने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.