दोन स्वतंत्र कुस्ती संघांची निवड
06:27 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
Advertisement
अमेरिकेत 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनने 23 वर्षाखालील वरिष्ठांच्या तसेच वरिष्ठांच्या विश्व कुस्ती स्पर्धेसाठी स्वतंत्र संघ उतरविण्याचे ठरविले आहे. या दोन स्पर्धांमध्ये काही दिवसांचे अंतर असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 23 वर्षाखालील विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा अमेरिकेत होईल. तर 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान कझाकस्तानमध्ये वरिष्ठांची विश्व कुस्ती स्पर्धा घेतली जाणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी निवड चाचणी स्पर्धा घेतली जाणार आहे. या चाचणीनंतर दोन्ही स्वतंत्र संघ जाहीर केले जातील.
Advertisement
Advertisement