For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विक्की कौशलच्या जागी शाहिदची निवड

06:31 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
विक्की कौशलच्या जागी शाहिदची निवड
Advertisement

‘अश्वत्थामा’ चित्रपटात मुख्य भूमिका

Advertisement

बॉलिवूड चित्रपट ‘अश्वत्थामा :द सागा कंटीन्यूज’ची घोषणा खूप अगोदर करण्यात आली होती. चित्रपटात विक्की कौशल मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले होते. तर दिग्दर्शनाची धुरा आदित्य धर याला सोपविण्यात आली होती. परंतु यानंतर या चित्रपटासंबंधी कुठलीच गोष्ट समोर आली नव्हती. पण आता या चित्रपटात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

चित्रपटाची निर्मिती वासु भगनानी करत आहेत. या चित्रपटात आता विक्की कौशलऐवजी शाहिद कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच आदित्य धर आता याचे दिग्दर्शन करणार नाही. याऐवजी सचिन रवि यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘अश्वत्थामा : द सागा कंटीन्यूज’ हा एक पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. तो हिंदीसाब्sात तमिळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड भाषेत निर्माण केला जाणार आहे.

Advertisement

या चित्रपटासंबंधी शाहिदने एक पोस्ट शेअर केली आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळ जेव्हा परस्परांना भिडतील तेव्हा मिथ्य आणि सत्य धूसर होईल. अश्वत्थामा : द सागा कंटीन्यूज हा एका अमर योद्ध्याची कहाणी दर्शविणारा चित्रपट असल्याचे शाहिदने नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.