For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरपीडीच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

09:46 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
आरपीडीच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Advertisement

बेळगाव : धारवाड येथे झालेल्या कर्नाटक राज्य पदवीपुर्व महाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धेत आरपीडी महाविद्यालयच्या विद्यार्थिनींनी उत्तम कामगिरी करीत यश संपादन केले.आरपीडी महाविद्यालयाच्या मुलींनी प्रथमच 4×100 मी रिलेमध्ये सुवर्णपदक मिळविले. त्यामध्ये वैभवी बुद्रुक, अपूर्वा नाईक, स्मिता काकतकर आणि आदिती गडकरी यांचा समावेश होता. याचबरोबर वैभवी बुद्रुक हिने 100 मी. व 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. अपूर्वा नाईक हिने 100 मी. अडथळा स्पर्धेत सुवर्णपदक व 200 मी. कास्यपदक मिळविले व स्मिता काकतकर हिने लांब उडी व तिहेरी उडीमध्ये रौप्यपदक पटकाविले. महाराष्ट्र येथील चंद्रपूर येथे होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये हे सर्व खेळाडू कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांना प्राचार्या  सुजाता बिजापुरे व महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक आनंद रत्नाप्पागोळ यांचे प्रोत्साहन लाभत आहे. तर अॅथलेटिक प्रशिक्षक ए.बी. शिंत्रे व क्रीडा शिक्षक उमेश बेळगुंदकर व सुरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.