संत मीरा हिंडलगा स्कूलच्या खेळाडूंची निवड
11:18 AM Nov 05, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : हिंडलगा गणेशपूर येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या खेळाडूंची विद्याभारती मलखांब आणि दोरीवरील मलखांब या प्रकारासाठी राष्ट्रीयस्तरावर निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी हा संघ उज्जैनला रवाना झाला आहे. नुकत्याच झालेल्या प्रांतीय व क्षेत्रीय स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विद्याभारती आयोजित मलखांब व दोरीवरील मल्लखांब क्रीडा प्रकारात या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी श्रीशांतया हिरमेठ, खंडु पाटील, पृथ्वीराज पाटील, नंदन कदम, समर्थ नरगुंद, जयवर्धन पाटील, गुंजन चौगुले, नकुषा कडोलकर, तनिष्का बांबुरे यांचा दक्षिण मध्यक्षेत्र संघात समावेश आहे. त्यांना प्रशिक्षक सुरज देसुरकर, क्रीडा शिक्षक श्रीकांत कांबळे, श्वेता पाटील, आशा भुजबळ आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article